काटी , दि. १५: उमाजी गायकवाड
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध भरगच्च कार्यक्रमाने सर्वञ उत्सर्फुतपणे सोमवार दि. १५ रोजी साजरा करण्यात आला. विशेषत: 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव, तामलवाडी,सुरतगाव, दहिवडी, केमवाडी, यमगरवाडी आदी गावात नागरिकानी उत्साहात सहभाग नोंदवत जागोजागी, प्रत्येक घरावर, शासकीय, निमशासकीय कार्यालयावर, शाळा, सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालयावर 13 ते 15 ऑगस्ट राष्ट्रध्वज फडकविला.
राष्ट्रभक्तीपर गीतांचा वेगळाच वातावरण या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांमधून देशभक्तीचा जल्लोष दिसून आला.
देशभक्तीचे गीते, "भारत माता की जय" चा जयघोष, प्रत्येक घरावर डौलाने फडकणारे तिरंगा झेंडे यामुळे देशभक्तीचे वातावरण दिसून आला.
स्वातंत्र्य दिनी विविध ठिकाणी करण्यात आले ध्वजारोहण
काटी ग्रामपंचायत कार्यालय
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर 13 व 14 ऑगस्ट रोजी इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी मानाजी भानवसे, व चि. ऋषिकेश अरुण ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
काटी विविध कार्यकारी सोसायटी
काटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या आवारात माजी सैनिक ईजदानी बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सेक्रेटरी संजय साळुंके यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक, पदाधिकारी ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.
येडेश्वरी कन्या प्रशाला
मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर, संचलित येडेश्वरी कन्या प्रशाला काटी येथील प्रशालेत मराठा समाज सेवा मंडळाचे संचालक शिवदास चटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मिराताई ढगे, पोलीस पाटील सौ. सुनंदा म्हेत्रे, सुहास साळुंके, माजी सैनिक श्रीकांत गाटे, संतोष थिटे, ईजदानी बेग, प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर बनसोडे, सहशिक्षक सुनिल खेंदाड, दिगंबर कदम, गणेश गुंगे, उमाकांत कदम, तुकाराम गवळी, शिक्षकेत्तर गणेश ढास, श्रीमती चंदनशिवे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थीनीं उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रशालेचे मुख्याध्यापक अहमद सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्रशालेत मुख्याध्यापक ए.जी. शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच शामलताई हंगरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीब काझी, गणपत चिवरे, उपाध्यक्ष श्रीमती जामगावकर, सुनिल गायकवाड, सहशिक्षक तानाजी शेळके, राजेंद्र कापसे, सुधीर बोंदर, इंद्रजित जंगले, भारत कटकदौड, गोविंद जोशी, श्रीमती सविता पवार, विद्युलता आलाट, सुषमा माने, रेखा कोळी, मुख्याध्यापक सत्यवान रसाळ, अजित इंगळे, पंकज काटकर, एस.आर.राठोड, जी.एस.भुमकर, एच.डी.कदम,एस.एम. भालेराव, सौ. एस.के.सुरवसे, क्षिरसागर व्ही.एम., श्रीकांत पांगे,दैवशाला कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सैनिक कल्याणकारी संस्था
काटी येथील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने बसस्थानक शेजारील कार्यालयासमोर माजी सैनिकाच्या वयोवृद्ध विधवा पत्नी सुमनबाई चंद्रहारी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक जगदेवराव खपाले, श्रीकांत गाटे, संतोष थिटे, ईजदानी बेग, विठ्ठल क्षिरसागर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, सयाजीराव देशमुख,प्रदीप साळुंके, अतुल सराफ, करीम बेग, रामेश्वर लाडुळकर, दलित मित्र नंदु बनसोडे, पत्रकार उमाजी गायकवाड,ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, दादा गाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
भिमनगर येथे ध्वजारोहण
काटी येथील भिमनगरमध्ये सरपंच आदेश कोळी, व दलित मित्र नंदु बनसोडे यानी ध्वजारोहण केले. यावेळी दलित मित्र नंदु बनसोडे यांनी स्व:रचित देशभक्तीपर व व्यसनमुक्तीपर गीत गाऊन तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश दिला. यावेळी सरपंच आदेश कोळी, पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले, सयाजीराव देशमुख, प्रदीप साळुंके, अशोक जाधव, माजी सैनिक जगदेवराव खपाले, श्रीकांत गाटे, संतोष थिटे,बाळू लोंढे, ईजदानी बेग,रामेश्वर लाडुळकर, दलित मित्र नंदु बनसोडे, पत्रकार उमाजी गायकवाड, प्रकाश गाटे, सुहास साळुंके,ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, दत्तात्रय सोनवणे, दशरथ बनसोडे, भोलेनाथ बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
एकलव्य विद्या संकुल (आश्रम शाळा), यमगरवाडी
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेचे ध्वजारोहण भटके विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एकलव्य विद्या संकुल प्राथमिकचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, प्रमुख पाहुणे डॉ.आदीनाथ राजगुरु, प्रशांत संकपाळ, मुक्ताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वाघ, सहशिक्षक अण्णासाहेब मगर,महादेव शेंडगे,अशोक बनकर, अनिल घुगे,बालाजी क्षीरसागर,संतोष बनसोडे, दयानंद भडांगे,हरीश मगदूम,किरण चव्हाण, प्रणिता शेटकार,निर्मला हुग्गे,सविता गोरे,फुलाजी ताटीकुंदाळवर,संगीता पाचांगे,सुजाता गणवीर कोंडीबा देवकर,खंडू काळे ,दत्ता भोजने ,भीम कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.आदीनाथ राजगुरु, उस्मानाबाद यांच्या वतीने इयत्ता 10 वी मधील प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, व दोन हजार असे रोख स्वरूपात प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. त्याच प्रमाणे मुक्ताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती वाघ यांच्या वतीने प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयेचे बक्षीस देऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. तर प्रमुख पाहुणे प्रशांत संकपाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ तर अनंत काळे सोलापूर, यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दोन वेळेस भोजन देण्यात आले.
दहिवडी ग्रामपंचायत कार्यालय
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सौ. रुपाली प्रशांत गाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. साधना भागवत मंडलिक, ग्रामसेवक आर.व्ही.येलम, ग्रा.प. सदस्य सौ. कल्पना अंबुरे, विठ्ठल गायकवाड, संजय आदलिंगे, सचिन गाटे, प्रशांत गाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने गावात वृक्षारोपण करण्यात आले.
सावरगाव ग्रामपंचायत कार्यालय
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जेष्ठ नागरिक शंभर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, ग्रामसेवक प्रदीप लाटकर,पंढरी डोके, नेताजी कदम, प्रताप माने, शिवाजी माळी, युवराज पाटील, श्रीकांत हजारे, रमेश काढगावकर, जगन्नाथ काढगावकर, मोहन कुंभार, महेश मारडकर,अमोल माने, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तामलवाडी ग्रामपंचायत कार्यालय
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. मंगलताई गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच हमीद पठाण, ग्रामसेवक दयानंद रेड्डी, ग्रा.पं. सदस्य सौ.संजना गुरव,सौ. सुरेखा माळी, नुरबानू बेगडे, सुधीर पाटील, सतिश माळी, अप्पा रणसुरे, हणमंत गवळी,माजी पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा गायकवाड, डॉ. रविकांत गुरव, माजी सैनिक शिवाजी सावंत,शाहीर पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय तामलवाडी
त्रिंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तामलवाडी, संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते व सरपंच मंगल गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच मंगल गवळी, सोसायटीचे चेअरमन भास्कर पाटील, संस्था उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत लोंढे, संस्थापक संचालक मल्लिकार्जुन मसुते, बाळासाहेब जगताप, गोरख माळी, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, सोसायटीचे सचिव सुधाकर लोंढे, प्राचार्य सुहास वडणे, औदुंबर माडजे, सुधीर पाटील, सतीश माळी, अप्पाराव रणसुरे,प्रभाकर जाधव, महादेव माळी, चंद्रकांत साळुंके, महादेव मसुते, बसवंत पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प.प्रा.शाळा नरसिंहवाडी क्रमांक -2
तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नरसिंहवाडी क्रमांक -2 येथे देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी रुपात साजरा करण्यात आला.
प्रारंभी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.भारत माता की जय, वंदे मांतरम , हर घर झेंडा घरोघरी तिरंगा इ.देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ध्वजारोहन शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर कदम यांचे हस्ते करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.आभार शाळेतील शिक्षक सोमनाथ जामगांवकर यांनी केले.यावेळी अंगणवाडीच्या श्रीमती सुनिता पंके, मदतनीस श्रीमती अंबुबाई चव्हाण व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
तुळजाभवानी महाविद्यालय
तुळजापूर दि.15, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे 75 वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला, यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,तर तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले,आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमातंर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यावेळी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, यावेळी मेजर डॉ वाय.ए.डोके यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी छात्रांचे नेत्रदीपक संचालन पार पाडले.याप्रसंगी तुळजाभवानी संकुलातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेक कोरे यांनी केले