तुळजापूर ,दि. २७ :
मानवाच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी गुरुकृपा असणे गरज असल्याचे प्रतिपादन लक्ष्मीकांत पारनेरकर महाराज यांनी मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.
तुळजापूर येथे नव्याने शिवराम मंदिराची उभारणी रत्नाकर बाबुराव खोले यांच्या तुळजापूर ते पाचुंदा रोड लगत असलेल्या शेतामध्ये होत असून या मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात पारनेरकर महाराज हे बोलत होते.
या पायाभरणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुनील रोचकरी , माजी नगराध्यक्ष तुळशीदास साखरे हे उपस्थित होते. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मंदिरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज व रामचंद्र महाराज यांच्या मूर्ती मंदिरात राहणार असल्याची माहिती देण्यात आली. शिवराम मंदिराच्या उभारणीसाठी तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष रत्नाकर बाबुराव खोले व त्यांच्या परिवारांनी या मंदिर उभारणीसाठी आपली स्वतःची जमीन दान रूपाने मोफत दिलेली आहे. या मंदिर उभारणी पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी शाहूराज कवठेकर आनंद मुठाळ डॉ. लोंढे , निलेश रोचकरी , निरंजन टेकाळे , सोलापूरचे अभय जोशी , उपाध्ये ढोले, सुधीर रोचकरी, राहुल भालेकर, धनंजय हंगरगेकर, माजी नगरसेवक नितीन पाटील, सुदर्शन वाघमारे, परशुराम प्रतिष्ठान, जय भवानी तरुण मंडळ, जाणता राजा युवा मंच ,जय भारत तरुण मंडळ व शहरातील प्रतिष्ठित नागरिक व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तुळजापूर शहरातील पूर्व कासार गल्लीतील श्रीमती विमल पैठणकर यांच्या वाड्यात असणाऱ्या परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या मंदिरात भेट देऊन पूर्णवाद उपासकांनी मनोभावनेने भक्तांनी दर्शन घेतले.
शिवराम मंदिर उभारणीसाठी रत्नाकर खोले यांच्याकडून मोफत जमीन दान देण्यात आली आहे.