काळेगाव,दि. २७ : 

मौौजे काळेगाव ता. तुळजापूर येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी वैजनाथ उंबरे यांची निवड करण्यात आली आहे.

काळेगाव ता तुळजापूर येथे शालेय व्यवस्थापन समितीची बैठक होवुन सर्वानुमते नुतन पदाधिका-यांची  निवड करण्यात आली. यामध्ये  वैजनाथ दत्तात्रय उंबरे यांची अध्यक्षपदी तर सौ. चंद्रकला शंकर भोवाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  अतुल प्रकाश पोतदार  ( मुुख्यध्यापक ) यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. सदस्य -  मारुती उबंरे , अश्विनी गडदे ,यशोदा मुळे ,सावळाराम जेटीथोर ,  अमोल कोरे,सचिन कोरे , ग्रामपंचायत सदस्य संगीता घाडगे , बालाजी कांबळे , अरविंद माशाळे , शुभम शेंडगे, अतुल पोतदार आदीची निवड करण्यात आली.
सदरील समिती मध्ये एकुण १३ सदस्य  आहेत. त्यामध्ये एक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी  सहशिक्षक गायकवाड , माशाळे , व पालक नवनाथ टकले, सत्यवान साखरे,  बालाजी मुळे, गोविंद मुळे, आदी उपस्थित होते.
 
Top