काटी, दि. २९ :


 काटी ता.तुळजापूर येथील तरुण शेतकरी मदन विजयसिंह चव्हाण वय 35 वर्षे  यांची रविवार दि.28 रोजी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घरातून शेतात जातो असे सांगून  घराजवळीलच  चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कशामुळे केली हे मात्र कळू शकले नाही. 
       
त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी चार वाजता  कंटेश्वर  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील आठवड्यात  शिवाजी मासाळ या शेतकऱ्यांनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे आठवडाभरातील आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन लहान मुले, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. 
 
Top