उमरगा,दि.२८:  लक्ष्मण पवार

 तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लि . च्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार, सचिन सिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी सभासद व संचालकांच्या हस्ते दि .२७ रोजी संपन्न झाला .
          

 समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकरी सभासद व संचालकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला . 


कारखान्याचे संचालक  सुनील माने यांच्या हस्ते गव्हानीचे पूजन करूण सर्व संचालक शेतकरी सभासदांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली . भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी साडेचार लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करत परिसरातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक 2500 रुपये विक्रमी भाव दिला आहे . त्यामुळे भाऊसाहेब बिराजदार कारखान्यास ऊस देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत .
       
यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असून कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन 15 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले आहे . त्यानंतर गुरुवार दिनांक 27 रोजी कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे . यावर्षी सात लाख मे .टन ऊस गळफाचे उद्दिष्ट असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी यावेळी सांगितले .
         


यावेळी  क्युनर्जी इंडस्ट्रीज चे संचालक सचिन सिनगारे, कारखान्याचे  व्हा .चेअरमन पद्माकरराव हराळकर ,संचालक सुनील माने, गोविंदराव साळुंखे, राहुल पाटील, युवराज कदम, इमाम पटेल, तुकाराम बिराजदार ,किसन पाटील , अभिजीत माडीवाले ,आर .डी. माने ,व्यंकटराव सोनवणे , बब्रुवान औटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय पवार लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी ,भीमा स्वामी, गोविंदराव पवार, नानाराव भोसले ,बाळासाहेब स्वामी ,शमशोद्दीन जमादार ,नेताजी कवठे, दत्ता इंगळे , नाना माने,डॉ .फरीद अत्तार ,माधवराव पाटील ,प्रकाश भगत ,रमेश बिराजदार,अजित पाटील, विष्णु भगत ,प्रदीप पाटील ,बाळू बिराजदार, प्रताप महाराज, संदिपान पाटील ,ज्योतीराम औरादे, दिगंबर औरादे, प्रकाश सुभेदार, शिवाजी पवार, देविदास पावशेरे, मोहन शिंदे, दत्ता वाडीकर , गजेंद्र जावळे , फैयाज पठाण, बाळासाहेब बुंदगे, कल्लेश्वर जाधव, शिवाजी सांगवे , बालाजी साळुंखे, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .


सुरेश बिराजदार (चेअरमन भाऊसाहेब बिराजदार कारखाना)
कारखान्याची गाळप क्षमता वाढवलेली असून चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यात आली आहे.
यावर्षी सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून.
 ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी याही वर्षी चांगल्या प्रतिचा ऊस गाळपासाठी द्यावा. जेणेकरून यावर्षीप्रमाणे पुढील वर्षीही जास्तीचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल .कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप करण्यात येणार असुन सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व सभासदांनी ऊस परिपक्व होण्यासाठी व गाळपासाठी संयम बाळगावा . 
                
 
Top