काटी , दि. ३१
तुळजापूर तालुक्यातील काटी जि.प.केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय एकता सप्ताह निमित्त एकात्मतेवर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे मुख्याध्यापक अमीन शेख यांनी केले. तर केंद्राचे केंद्रप्रमुख सोलनकर यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती सांगितली.
यावेळी शाळा व्यवास्थापन समितीचे अध्यक्ष नजीब काझी,उपाध्यक्ष श्रीमती पल्लवी जामगांवकर, केंद्रीय मुख्याध्यापक अमीन शेख,केंद्रप्रमुख सोलनकर , श्री क्षेत्र इंद्रजीत जंगले, बापू काळे,श्रीकांत पांगे, हर्षवर्धन माळी,सोमा जामगांवकर, अंगणवाडीच्या सिंधुताई ढगे व विद्यार्थी उपस्थित होते.