उमरगा ,दि.२४: लक्ष्मण पवार
निसर्ग सौदर्य, साधू संत व ऋषि मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील तुरोरी परिसरातील अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंत्ती महोत्सवानिमित्त मंगळवारी सायंकाळ पासून व बुधवारी (०६ व ०७) दिवसभर दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरापासून दहा किमी अंतरावर राज्याच्या सीमेवर सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गालगत डोंगरावर निसर्ग सौंदर्याने नटलेले अचलबेट देवस्थान असून याला प्राचीन काळातील ऋषि मुनी व साधु संतांच्या योग साधनेचा वारसा लाभला आहे. वै.हभप. काशिनाथ महाराज, वै. हभप. उज्वलानंद महाराजांनी देवस्थानचा विकास तसेच परिसरातील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास गावात अध्यात्मिक प्रचार व प्रसार केल्याने दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम, भजन, प्रवचन, किर्तन,हरीजागर, काकडा आरती आदीसह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यंदाच्या वर्षी दोन दिवस सुरू असलेल्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वा. हभप. ज्ञानदेव गुरूजी सुर्यवंशी हालसी यांचे प्रवचन आहे. राञौ ७ ते ९ यावेळेत हभप.पू.श्री.ज्ञानसिंधू चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे.
बुधवारी सकाळी ९ वा. श्री गुरू चरित्र पारायणाचे समारोप, सकाळी १० ते ११ यावेळेत हभप. श्री. जनार्दन हेबाडे गुरूजी यांचे प्रवचन होणार आहे. सकाळी ११ पासून नियमाचे हजेरी भजन सेवा हभप. भिम महाराज, किसन खोबरे, ज्ञानेश्वर बरमदे, जनार्दन भोसले, बाळासाहेब जांभळदारे, दामोदर मुगळे, रेणके गुरूजी, एकनाथ पांचाळ, विठ्ठल दामोदरे, सुनील माने, तुकाराम जाधव, तुकाराम माने, ईश्वर गुरूजी, सुनील चेळकर, ज्ञानेश्वर येवते, पिंगाने सर, शिवाजी पाटील, मोहिते गुरूजी, मंगेश लांडगे, दयानंद पाटील, नेताजी जाधव, रावसाहेब पाटील, निळकंठ जाधव, अंबादास सोळूंके, मारूती साबदे, विठ्ठल महाराज, खेळगे महाराज, खंडू मुळे, रमेश करनूरे, जयपाल ढगे, पुंडलिक टेकले, तुकाराम शिंदे, बाबूराव पांचाळ, किसन जाधव, पंढरी पाटील, बालाजी कारभारी, विश्वनाथ माने, बाबुराव गुरूजी, अशोक पाटील, माधव आगलावे, सिद्राम हाडपद, गुरू कारागीर, गंगाराम कुंभारे, नवनाथ कैतके साहेब, सुशील पांचाळ, शाहू पांचाळ, निळकंठ मुळे, अवधूत मोरे, बाबुराव हाडपद, नाटकरे साहेब, गुलाब थोटे, संदीप मरकटे, श्रीहरी माने, दाजीबा माने, अनिल बाबळसुरे, बळवंतराव जाधव, शाम गायकवाड, मकरंद पाटील, प्रल्हाद सोळुंके, एकनाथ कदम, सचिन मुगळे, विक्रम जाधव, सोनाजी आनंदवाडे हे संपन्न करणार आहेत.
दुपारी २ ते ४:30 या वेळेत श्री शाम गोराणे सौ. ज्योती गोराणे व सोहम गोराणे यांचे संगीत भजन सेवा होणार आहे.
सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळी दत्त जयंतीनिमित्त ह. भ. प. हरी गुरूजी लवटे यांच्या प्रवचन सेवेनंतर लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करीत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी दिवसभर श्री दत्त जन्मोत्सवामुळे देवदर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. श्री परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप. भिम महाराज, संजय राठोड, नरसिंग लवटे, राजू माळी, हभप. हरी गुरूजी लवटे , जनार्दन भोसले, बाळू जांभळदारे, बंडु गुरूजी, मगर बिराजदार,करण कुन्हाळे,जगन्नाथ मुगळे, पंडित मुळे,बाळू पाटील, लक्ष्मण पवार, दामू बिराजदार,निळकंठ जमादार,गोविंद माने, ज्ञानेश्वर बरमदे, आबा मोरे , अशोक कारभारी, धोंडीराम मुगळे, बबर माने, एकनाथ कदम, सचिन मुगळे, ललित पटेल, सुरज राठोड, दर्शन मोरे,गणेश सुर्यवंशी,पांडुरंग पाटील सरजवळगा, हाणमंत जोगे आदीसह परिसरातील भाविकांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
अचलबेटच्या उंच डोंगरावर वै.हभप उज्ज्वलानंद महाराज यांनी महादेव, विठ्ठल रुक्मीणी, हनुमान या देवतांच्या एकत्रित भव्य मंदिराची उभारणी केली आहे. तर भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, पाणी पुरवठा योजनेसह शौचालयाची कामे पुर्ण करीत भाविकांना सर्व सीयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.