कळंब ,दि.२९: भिकाजी जाधव
महाराष्ट्र लोक विकास मंच (मलोविम) ही महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची संघटना असून, गेली 28 वर्षे सर्वंकष ग्रामीण विकास व वंचित घटकांचे हक्क व अधिकार या विषयावर कार्य करीत आहे. सामाजिक संस्थांच्या बळकटीकरणाच्या माध्यमातून मुलं,महिला, पाणी, जमीन,दुष्काळ ,रोजगार, यांच्या न्यायिक हक्कासाठी स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.
मलोविम गेली 16 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, महिला, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, शेती, पाणी, ग्रामीण विकास तसेच वंचित घटकांसाठी, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचा *कार्य गौरव पुरस्कार* देवून सन्मान करते. त्यानुसार मलोविमने 2022 सालाचे पुरस्कार नुकतेच जाहीर केले असून, 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून, बीड येथील इन्फंट इंडिया ट्रस्ट येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला जाणार आहे.
मलोविम कार्यगौरव पुरस्कार पुढील मान्यवरांना देऊन सन्मानित केले जाणार आहे.
*1. चंद्रकला भार्गव, लातूर -* महिला, आरोग्य व ग्रामविकास.
*2. कल्पना गायकवाड, लातूर -* सक्षम महिला, पंचायतराज.
*3. सुनंदा खराटे, उस्मानाबाद -* एकल महिला पुनर्वसन.
*4. गौरी शिंदे, बीड -* ट्रान्सजंडर कार्य.
*5. वैशाली पाटील, रायगड -* स्त्रीशक्ती व लोकचळवळ.
*6. बंडू खराटे, उस्मानाबाद -* लोककला व शाहिरी
*7. भैरवनाथ कानडे, उस्मानाबाद -* साहित्यिक व समालोचक.
*8. दत्तात्रय नलावडे, बीड -* शेक्षणीक कार्य.
*9. उमेश टोणपे, औरंगाबाद -* उत्कृष्ठ व्यवस्थापन.
*10. हरीचंद्र ढाकणे, पुणे -* सामाजिक कार्य
*11.दत्तात्रय मानगुडे, सांगली -* साहित्यरत्न
*12. संतोष राऊत, सोलापूर -* ग्रामीण विकास.
*13. राम शेळके, अहमदनगर -* आरोग्य सेवा.
*14. रवींद्र राऊत, यवतमाळ -* पाणीदार माणूस.
*15. राजेंद्र कासार, अहमदनगर -* कै मधुकर धस पाणीदार माणूस.
विशेष मानाच्या पुरस्काराची सुरुवात
महाराष्ट्र लोकविकास मंचतर्फे, या वर्षापासून राज्यस्तरीय, "जीवन गौरव पुरस्कार " सुरू करण्यात आला आहे. *2022 च्या मानाच्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अफार्म संस्थेचे माजी कार्यकारी संचालक, एम. एन.कोंढाळकर (सर) यांची निवड मलोविमने केली आहे.*
महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था, संघटना, संस्थाचालक व कार्यकर्त्यांच्या क्षमता वर्धनासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून, सर्वंकष ग्रामीण विकास व सामाजिक परिवर्तन यासाठी कोंढाळकर सर, 50 वर्षाहून अधिक काळ, आज वयाच्या 75 व्या वर्षीही महाराष्ट्रभर फिरून कार्य करीत आहेत. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
2021 च्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोनचे यजमानपद जबाबदारी, बीड येथील इन्फांट इंडियाचे दत्ताभाऊ बारगजे, नवचेतना संस्था केज मनीषाताई घुले, पसायदान संस्था बीडचे ओम गिरी यांनी स्वीकारली आहे.
पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी मानपत्र शाल श्रीफळ हार असे असेल.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकविकास मंचाचे अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर , उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, M.N. कोंढाळकर सर, मंगलताई दैठणकर, रमाकांत बापू, दत्ताभाऊ बारगजे, ओम गिरी, मनीषाताई घुले, आणि महाराष्ट्र लोकविकास मंचचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सेवा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.