तुळजापूर , दि . ०३
तुळजापूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन दि.१७ डिसेंबर संपन्न होणार असून परिषदेच्या तुळजापूर तालुका पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे,मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी तुळजापूर येथील आयोजित बैठकीत तुळजापुर तालुका पदाधिकारी विस्तार घोषित केला.
तुळजापूर तालुकाध्यक्ष अनिल आगलावे यांच्यासह तालुका उपाध्यक्षपदी भाग्यश्री देवकते,सचिवपदी डॉ.अविनाश ताटे,कोषाध्यक्षपदी जयमाला वटणे, तालुका कार्यवाहकपदी राहुल दुलंगे यांची निवड जाहीर करण्यात आली आहेत.