पत्रकार महाजन यांच्या वरील हल्ल्याचा जाहीर निषेध : हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
नळदुर्ग, दि. १३
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या गावगुंडाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूर व नळदुर्ग, जळकोट, अणदूर परिसरातील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
यासंदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्यात पत्रकार संघाच्या वतीने एक लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, पाचोरा,जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटनेची बातमी दिल्याने दुखावलेले स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी फोनवरून पत्रकार संदीप महाजन यांना मारण्याची धमकी दिली व आमदारच्या गावगुंडानी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर खुनी हल्ला केला. सदर घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारी असून आभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणनारी आहे. सदर निंदनीय घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या गांवगुडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून त्याना कडक शासन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक याना देण्यात आलेल्या निवेदनावर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी प्रकाश गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड, किशोर धुमाळ, ईरफान काझी, संजय पिसे, राजेंद्र स्वामी, सतिश राठोड आदीच्या पत्रकारांच्या सह्या आहेत.