गुरुवारी श्री क्षेञ रामतीर्थ देवस्थान मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबीर
नळदुर्ग,दि.०९
श्री क्षेञ रामतीर्थ देवस्थान मंदिरात गुरुवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकानी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री रघुनाथजीं महाराजांच्या कृपेने रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग यांच्या वतीने महंत श्री विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व दिल्ली येथील नामांकित शिवम ऑप्टिक्स, लेडीज सर्कल इंडिया व नेत्र चिकित्सक डॉ. आनंद काटकर , वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांच्या सहकार्याने गुरुवारी दि. 10 आॕगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रामतीर्थ मंदिर, येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिबीरात मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, नंबर चेक करणे व मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी शिबिरास येताना लाभार्थीनी सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.