भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्याने घ्यावा - राहुल मते
नळदुर्ग ,दि.१८
राज्य शासनाने शेतकऱ्याच्या हितासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक राहुल मते यांनी केले आहे.
शहापूर ता. तुळजापूर येथे दि. १६/९/२०२३ रोजी सोयाबीन शेती शाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश गोरे होते तर उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राहुल मते म्हणाले की, सोयाबीन उत्पादकता वाढ प्रकल्पांतर्गत ही सोयाबीन शेती शाळा आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, व तंबाखू पाने खाणारी व शेंगा पोखरणाऱ्या, अळयांचे नियंत्रण करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर फवारणी करताना घ्यावयाची काळजी, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, पॉली हाऊस पॅक हाऊस , कृषी यांत्रिकीकरण शेड नेट pmfme इत्यादि योजनेची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.