तापाच्या आजाराने फणफणले; डेंग्यू सदृश आजाराने नळदुर्ग व ग्रामीण भागातील नागरिक ञस्त
नळदुर्ग, दि.२३ : सप्टेंबर
डेंग्यू सदृश आजाराने नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात हिवतापाचे रुग्ण आढळून येत असुन नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आसल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
नळदुर्ग शहर व परिसरात साथीच्या रोगाने अनेक रूग्ण हैराण असून भरिस भर म्हणून खासगी व उपजिल्हा रूग्णालयाच्या तपासणीत डेंग्यू सदृष्य रूग्णही आढळून आल्याने शहरवासियातुन चिंंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील बहुतांशी खासगी रूग्णालयात सर्दी खोकल्याच्या रूग्णांनी गर्दी केली आहे.
नळदुर्ग येथिल उपजिल्हा रूग्णालयात मागील काही दिवसात चार डेंग्यू सदृष्य रूग्णावर उपचार करण्यात आले आहेत. डेंग्यू संबधी काळजी घेण्याबाबत आठ दिवसापूर्वी नगरपालिकेस पत्र दिल्याची माहिती उप जिल्हा रूग्णालयातून देण्यात आली. तसेच धक्कादायक बाब म्हणजे डेंग्यू तपासणीच्या किटचा तुटवडा असल्याची गंभीर बाब समोर आली असून आरोग्य विभागाकडून त्वरीत हे किट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शहरातील खासगी रूग्णालयात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे, आशातच भिमनगर, रहीमनगर, वसंतनगर या ठिकाणी डेंग्यू सदृष्य रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कांही रुग्ण सोलापूर येथिल खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
नळदुर्ग नगरपालिका प्रशासनाला नाही गांभीर्य
येथील नगरपालिकेला याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालया यांच्यावतीने आठ दिवसापूर्वी पत्र पाठवूनही नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छतेबाबात ठोस काही केल्याचे दिसुन येत नाही. निर्जंतुक औषध फवारणी, धुर फवारणी वेळच्या वेळी केली जात नाही. नागरिकांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
श्रीमती छमाबाई राठोड,माजी नगरसेविका,नळदुर्ग
शहरातील वसंतनगर याठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. घाणिचे साम्राज्य पसरले असुन कर्मचारी साफसपाई करीत नाहीत. या भागाकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वसंतनगर येथिल दोघाना डेंगू सदृश्य आजाराची लागण झाल्याने व नळदुर्ग येथे अरोग्य सुविधा म्हणावी तशी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वसामान्याना सोलापूर येथिल खासगी रुग्णालयात भरमसाठ रक्कम खर्चुन उपचार घ्यावे लागत आहे.
आशोक बंजारे ,नागरिक
शहरातील अक्कलकोट रोडलगत असलेल्या भागात डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याबाबत गेल्या आठवड्यापासुन नागरिक न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळोवेळी औषधे फवारणीबाबत सांगुनही त्यांची दखल घेतली नाही. न.प. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर वचक राहिले नसल्याने मनमानी कारभार होताना दिसुन येत आहे.