२१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील
दिव्यांग उमेदवारांकरिता “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा"
धाराशिव.दि.20:
जिल्हयातील दिव्यांग उमेदवारांकरिता “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा" 21 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करते.
“ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी ” या अभियानातंर्गत धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गुरुवार 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव व समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांचे संयुक्त वतीने दिव्यांग उमेदवारासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा छायादीप मंगल कार्यालय,धाराशिव येथे केला आहे.
या रोजगार मेळाव्यात निर्मान ऑर्गनायजेशन,नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर,एलआयसी ऑफ इंडिया धाराशिव,एसबीआय लाइफ इन्शुरन्स, अलमप्रभू गारमेंट असोसिएशन व अलमप्रभू कोअर पाइप मॅनिफॅक्चरिंग या 6 आस्थापना/ कंपन्या सहभागी होणार आहे. या रोजगार मेळाव्यातुन 166 पात्रताधारक दिव्यांग उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरी इच्छुक दिव्यांग उमेदवारांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02472-299434 यावर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.