नळदुर्ग वागदरी बोळेगाव व परिसरात गौरी लक्ष्मी सण उत्साहात साजरा

नळदुर्ग, दि.२३ :एस.के.गायकवाड


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर, व वागदरी बोळेगावसह परिसरात "गौरी लक्ष्मी" हा सण मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
   

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने आनंदी आनंद झालेल्या वातावरणात  शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात गौरी लक्ष्मीचे  आगमन मोठ्या थाटामाटात झाले.यानिमित्ताने घरोघरी लक्ष्मी पूजन करण्यात आले. पुरणपोळी सह गोडधोड पदार्थची मेजवानी करून गौरी लक्ष्मीला अंलकाराने सजवून आपल्याला कल्पकतेने लक्ष्मी पुढे देवदेवतांचा देखावा व मनमोहक सौंदर्य देखावे करून गौरी पुजन करण्यात आले.बोळेगाव येथील सौ.संगीताताई सुरवसे तर वागदरी सौ.वंदनाताई किशोर धुमाळ यांच्या घरी आपापल्यापरिणे गौरीची सजावट करून लक्ष्मी पूजन केले व महाप्रसादाचे भोजन दान करून हा सण साजरा केला. 
  

एकंदरीत नळदुर्ग,वागदरी,बोळेगाव,सह परिसरात मोठ्या उत्साहात गौरी पुजन हा सण साजरा करण्यात आला.शेवटी शनिवार दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी हळदी कुंकूवाने गाठी घेऊन गौरी लक्ष्मीला आंनदाने निरोप देण्यात आला.
 
Top