नळदुर्ग - मराठा समाजाच्या वतीने आरक्षण प्रश्नी साखळी उपोषण प्रसंगी उपस्थित सकल मराठा समाज
नळदुर्ग, दि.३०
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठींबा देत नळदुर्ग येथे साखळी उपोषणास सुरवात झाली आहे. तसेच नळदुर्ग येथे बसस्थानक समोर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आसलेल्या मार्गावर राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी यांना गावांत प्रवेश बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नळदुर्ग परिसरातील अनेक गावात राजकीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
नळदुर्ग शहरात मराठा आरक्षण आदोंलनाबाबत निर्णय घेण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाचीही बैठक रविवारी रात्री संपन्न झाली व त्यावेळी नळदुर्ग पोलिसांना निवेदन देण्यत आले. सोमवार ता.३० रोजी शहरातील सखल मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यची मागणी करत महाविद्यालय रोड शिवनेरी तरूण मंडळाच्या जागेत साखळी उपोषणास सुरवात झाली.
यावेळी तानाजी जाधव, शरद बागल, संजय दशरथ जाधव, राजेंद्र काशिद, शिवाजी धुमाळ, आबाजी जाधव, संतोष मुळे, वैभव पाटील, बंटी मुळे, अंबादास पवार, अभय जाधव, रमेश जाधव, बबन चौधरी, शिवाजी सुरवसे, नेताजी किल्लेदार, बाळासाहेब जाधव, अशिष जगदाळे, प्रशांत चव्हाण, सहदेव जगताप, विनोद जाधव, बालाजी मोरे, आकाश काळे, गणेश शिंदे, रतिकांत नागणे, विशाल मोटे, हृषिकेश ढोणे आदीजन उपोषणास बसले