प्रा.डॉ. सत्यंद्र राऊत यांची राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड

नळदुर्ग,दि.२३ : एस.के.गायकवाड 

जवाहर महाविद्यालय अणदूर येथील संस्कृत विभाग प्रमुख, कवी व लेखक प्रा. डॉ. सत्येंद्र संगप्पा राऊत यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे अकरावी व बारावीच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्कृत पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी निवड झाली आहे.


प्रा. राऊत सरांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान असून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठात गत 20 वर्षापासून संस्कृत अभ्यासमंडळावर कार्यरत असून संस्कृतच्या  अभ्यासक्रमात  संपादित चार पुस्तकेही आहेत. सोबत अनेक प्रातिनिधीक  काव्यसंग्रह पण प्रकाशित झालेली आहेत. अभ्यासमंडळात निवड झाल्याने संस्थेचे सचिव  रामचंद्र आलुरे, विक्रम आलुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे,  सुरेश ठोंबरे , सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, पत्रकार एस के गायकवाड , दादासाहेब बनसोडे, भैरवनाथ कानडे ,अरूण लोखंडे,सिनेट सदस्य अंकुश कदम, नितीन राजे पाटील, सुरेश महाजन, महादेव राऊत व सोमनाथ खडके, विश्वनाथ खडके, महेश खडके आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top