नळदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी ग्रीन क्लब, एन.एस.एस व एन.सी.सी विभागाचा सहभाग
नळदुर्ग , दि. ०१ प्रा. दिपक जगदाळे
स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास या उपक्रमाचा नळदुर्ग किल्ल्यात आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या हास्ते शुभारंभ करुन किल्ला परिसरात स्वच्छता करण्यात आली.
रविवारी दि.१ ऑक्टोंबर रोजी भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर व कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि धरिञी विद्यालय यांच्या वतीने नळदुर्ग किल्ल्यामध्ये एक तास स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या सवच्छता मोहिमेचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या हास्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे अँड नितीन काळे , ॲड दिपक आलुरे , नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी नगरसेवक संजय बताले, उदय जगदाळे, नय्यर जाहागिरदार, निररंजन राठोड, छमाबाई राठोड, सुशांत भुमकर, पद्माकर घोडके, जयेश कदम, प्राचार्य सुभाष राठोड , मुख्याधिकारी लक्षण कुंभार, प्रकल्प आधिकारी सुरज गायकवाड, आजय काकडे, दिपक कांबळे , जोतीबा बचाटे आदीसह नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी , स्वछता कामगार उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्युरोतर्फे केंद्र शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम आणि नीती- धोरणाबाबत विविध माध्यमाद्वारे प्रसिध्दी केली जाते. तसेच विविध विषयावरती मोठ्या स्वरूपात डिजिटल प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. सदरील योजनांवर सनियंत्रण करून केंद्र शासनास फीडबॅक दिला जातो. म्हणून दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत: " कचरामुक्त भारत" या मोहिमेतर्गत देशातील महत्वपूर्ण व ऐतिहासिक स्थळांची सामूहिक स्वच्छता करणेबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या होत्या.
या अनुषंगाने दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत नळदुर्ग किल्यातील उपली बुरुज परिसराची स्वच्छता करण्यात आली.सदरील मोहिमे अंतर्गत महाविद्यालयातील ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
महाविद्यालयास व सहभागी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच श्रमदानानंतर अल्पोपहारची सोई देखील करण्यात आली.
सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, ग्रीन क्लब समन्वयक डॉ उद्धव भाले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ पंडित गायकवाड, एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा बाबासाहेब सावते, राष्ट्रीय छात्र सेना समन्वयक लेफ्टनंट डॉ अतिश तिडके, डॉ सुभाष जोगदंडे तसेच ज्यूनियर विभागातील एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा संजय गोरे, प्रा धनंजय चौधरी प्रा.झरीना पठाण,डॉ.दिपक जगदाळे , प्रा.प्रशांत घाडगे तसेच श्री बारीक शिंदे श्री किरण व्हंताळकर हे उपस्थित होते. त्याचबरोबर या स्वच्छते मोहीमेसाठी ग्रीन क्लब, एन एस एस आणि राष्ट्रीय शास्त्र सेना अशी एकूण 36 विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजक विभागीय प्रसिद्धी अधिकारी श्री अंकुश चव्हाण, श्री अंबादास यादव, कृषी अधिकारी श्री सचिन चव्हाण, मुख्याधिकारी श्री लक्ष्मण कुंभार उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजित सिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत नळदुर्ग शहरात महाश्रमदान करण्यात आले.
रेणुकामाता महिला बचत गट,भाग्यशाली महिला बचत गट,गायत्री महिला बचत गट नळदुर्ग शहरांमधे विविध ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली. सदर मोहिमेला शहरातील विविध नागरिक संघटना,विद्यार्थी, कर्मचारी यांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सदर स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडण्यास सहकार्य केले.