नळदुर्ग शहरासह जळकोट बंदला उत्सर्फुत प्रतिसाद ; सर्व पक्षीय नेत्यांना शहर बंदीचे बँनर, साखळी उपोषणाने जरंगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनस पाठींबा

नळदुर्ग, दि.३१ :एस.के.गायकवाड
 मराठा समाजाला सरकारने सरसकट कुनबी मराठा प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातील अरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व जळकोट शहरात मराठा आरक्षण समर्थनार्थ कडकडीत शहर बंद ठेवून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
   

मराठा आरक्षण समर्थनार्थ चालू असललेल्या आंदोलनाचे पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटले असून काही ठिकाणी या आंदोलनाची तिव्रता अधिक दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथे सखल मराठा समाजाच्या वतीने  बसस्थानक समोर शहरात प्रवेश  करणाऱ्या मुख्य रस्त्यावर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व पक्षीय नेत्यांना शहरात प्रवेश बंदी अशी बँनर बाजी करण्यात आली आहे. 

मंंगळवार दि.३१ आँक्टोबर रोजी सकाळ पासून येथील व्यपाऱ्यानी आपली दुकाने बंद ठेवून मराठा आरक्षण आंदोलन समर्थनार्थ कडकडीत बंद पाळला आहे. तसेच सकल मराठ समाजाच्या वतीने शहरातील मुख्य चौकात साखळी उपोषण सुरू करून मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
  
तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील शहरवजा जळकोट गावात मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदीचे बँनरबाजी करण्यात आली आहे. 
  
सावधगिरीची उपाययोजना म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी जिल्हाभर जमाव बंदीचा आदेश काढल्याने एरवी नळदुर्ग बसस्थानक परिसरात असलेली माणसांची वर्दळ कमी झाली असून रोज माणसाने गजबजून दिसणाऱ्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला आहे.
 
Top