आंतरमहाविद्यालयीन खो- खो स्पर्धेत नळदुर्गच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुलींचा पहिला तर मुलांनी तिसरा क्रमांक पटकाविला
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर येथे दि. १९ व २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो- खो स्पर्धेत नळदुर्ग येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर , विद्यमान सचिव उल्हास बोरगांवकर उपाध्यक्ष डॉ अभय शहापुरकर , कार्याध्यक्ष राम आलुरे सहसचिव प्रकाशराव चौगुले , शहबाज काजी , लिंबराज कोरेकर , अँड. प्रदीप मंटगे, संचालक बाबुराव चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चांदसाहेब कुरेशी, पर्यवेक्षक प्रा. नेताजी जाधव कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, क्रिडा शिक्षक डॉ. अशोक कांबळे, डॉ. कपिल सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी व गावातील नागरीकांनी अभिनंदन केले आहे.