बालविवाह मुक्त गाव आभियानास तुळजापूर तालुक्यातील बोरनदवाडी येथे सुरुवात
वागदरी,दि.५ एस.के.गायकवाड
हँलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर ता.तुळजापूरच्या वतीने आणि युरोपियन युनियन व स्विसेड संस्था पुणे यांच्या सहयोगाने तुळजापूर तालुक्यातील १५ गावामध्ये आणि लोहारा तालुक्यातील१५ गावामध्ये असे धारशिव जिल्ह्यातील एकुण ३० गावामध्ये बालविवाह मुक्त गाव आभियान राबविण्यात येणार असून तुळजापूर तालुक्यातील बोरनदवाडी या गावामधुन या आभियानास सुरुवात करण्यात आली आहे.
प्रारंभी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, गावातील युवक, युवती, व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत "आठरा वर्षाच्या आत करु नका लग्न, मुलीच्या जिवनात येईल विघ्न" अशा घोषणा देत गावातील मुख्य रस्त्यावरुन बालविवाह प्रतिबंध विषयी जनजागृतीपर रँली काढण्यात आली. शेवटी या रँलीचे जाहीर सभेत रुपांतर होऊन काही मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन निर्धार समानतेच्या प्रकल्पातील महिला विभागाच्य सहाय्यक समन्वयक (जी ई फँशिलीटेटर) तथा हँलो मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकर्त्या नागीणी सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिवेक्षिका इंदूबाई कबाडे,श्रीराम जाधव,गजेंद्र पुरी,कविता भोसले आदीनी परिश्रम घेतले .
यावेळी ग्रामसेविका एम.पी.गलांडे ,अंगणवाडीच्या विजया शेख,शाळेच्या मुख्याध्यापिका ए.के.पवार, तंटामुक्त अध्यक्ष विजय गोंगाणे,उपसरपंच निलेश भोसले, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष अशोक धनवडे,ग्रा.प.सदस्य सुमन गायकवाड आदीसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.