अणदूर बसस्थानकात बस येत नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय दुर करण्याची मनसेची मागणी
नळदुर्ग,दि.०१
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे राष्ट्रीय महामार्ग क्र 65 वर वसलेले एक मोठे गाव असून,या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गवरून धावणाऱ्या प्रत्येक एस.टी.बसेसचा थांबा हा अणदूर बसस्थानकात असुन नागरिकांना रस्त्यावर महाविद्यालयाच्या समोर सोडत आहेत. त्यामुळे अणदूर मधील नागरिकांना दोन रस्ते ओलांडून जावे लागत आहे. हैदराबाद वरून भरधाव वेगामध्ये गाड्या येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमरगाकडे जाणारे प्रवाशी बसस्थानकात बसची वाट पाहत ताटकळत थांबतात. बस बाहेरच्या बाहेर जात असल्याने प्रवाशी बसच्या मागे धावत जात आहेत. एसटी प्रशासनाने लवकरात लवकर गांभिर्याने लक्ष देऊन तात्काळ प्रवाश्यांची होणारी गैरसोय टाळावी,
अशी मागणी मनसेच्या अणदूर शाखेने जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,नळदुर्ग शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रकाकडे केली आहे, यावेळी सोमेश्वर आलूरे, हृतिक जाधव,स्वप्नील तिरगुळे,संकेत कोरे, कल्लु हिप्परगे, अजय हांडगे,तम्मा मुळे,आकाश बोंंगरगे,रवी टेलकर आदि उपस्थित होते.