मराठवाडा मुक्ती संग्रामातील शाहिद बचित्तरसिंह यांची जयंती नळदुर्ग शहरात साजरी
नळदुर्ग,दि. ११ : नेताजी महाबोले
मराठवाडा मुक्ती संग्राम लढाईवेळी नळदुर्गच्या ऐतिहासिक आलियाबाद पुलावर झालेल्या लढाईत भारतीय जवान बचित्तरसिंह हे शहीद झाले. देशाचा पहिला अशोकचक्र पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.
दि.10 जानेवारी रोजी शहिद बचित्तरसिंह यांची जयंती नळदुर्ग शहरात साजरी करण्यात आली.
यावेळी विनायक अहंकारी यांनी शहीद बचीत्तरसिंह यांच्या कार्याची माहिती दिली. प्रारंंभी नळदुर्ग विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे , पञकार विलास येडगे उत्तम बनसगोळे, भगवंत सुरवसे., शिवसेना ( उ.बा.ठा ) गटाचे सरदारसिंह ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे,मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, प्रभाकर घोडके, ब्राह्मण समाज संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप ग्रामोपाध्याय, राजकुमार वैद्य, पप्पू पाटील ,जेष्ठ नागरीक बंडाप्पा कसेकर,राजू ठाकूर उपस्थित होते.