केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 174 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे शुक्रवारी भूमिपूजन

धाराशिव,दि.22

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 174 कोटी 41 लक्ष रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन 23 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी दुपारी 12 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री विक्रम काळे,सतीश चव्हाण,सुरेश धस,ज्ञानराज चौगुले,राणाजगजीतसिंह पाटील व कैलास पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.या निमित्ताने सिद्धाई मंगल कार्यालय आणि लॉन्स, धाराशिव बायपास,धाराशिव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
                    

जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे,त्यामध्ये लातूर रोड जंक्शन साखळी क्रमांक 36 सोलापूर येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  52 येथे उड्डाणपूल पुलाचे बांधकाम करणे, याची किंमत 26 कोटी 79 लक्ष रुपये, सोनेगाव जंक्शन साखळी 76 सोलापूर येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 येथे उड्डाणपूल बांधणे किंमत 27 कोटी 70 लक्ष रुपये,सोलापूर येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धाराशिव बायपासवरील इतर ठिकाणी अतिरिक्त सेवा रस्ता आणि स्ट्रीट लाईट (पथदिवे) बांधकाम/ विस्तारीकरण करणे,हे काम 68 कोटी 41 लक्ष रुपयांचे आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील येडशी ते जावळे रस्त्याच्या दुपदरीकरण व मजबूतीकरण 10 कोटी 24 लक्ष रुपये, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी तेरणा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.या पुलाची लांबी 144 मीटर असून या पुलाच्या बांधावर 41 कोटी 27 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.
                           
 
Top