वागदरीत त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वागदरी (एस.के.गायकवाड):


वागदरी ता.तुळजापूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात जीवनाच्या आखेर पर्यंत समर्थपणे साथ देणारी माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  मातोश्री रमाई आंबेडकर महिला मंडळ व सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामान सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मिनाक्षीबाई महादेव बिराजदार,ग्रा.प.सदस्या मुक्ताबाई विलास बिराजदार, बचत गटाच्या अध्यक्षा सिंधूताई बिराजदार, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पवार आदी उपस्थित होते.
  

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून माता रमाईस आभिवादन करण्यात आले.
   याप्रसंगी बोलताना जेष्ठ समाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकुणच कार्यात माता रमाईने जिवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्थपणे साथ दिली. त्यांनी फार मोठा त्याग आपल्या जीवनात आपल्याकरिता केला म्हणूनच माता रमाईला त्याग मुर्ती म्हटले जाते.त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढीला प्रेरणादायी  आहे.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत वाघमारे यांनी केले तर सुत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन रमाई महिला मंडळाच्या उज्वला वाघमारे यांनी केले.   
 या प्रसंगी क्रषी सखी कोमल झेंडारे यांनी दिवंगत माजी ग्रा.प. सदस्या शकुंतलाबाई झेंडारे यांच्या स्मरणार्थ 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांची प्रतिमा महिला मंडळास भेट दिली.
  

या वेळी  माजी सरपंच नागनाथ बनसोडे, सहादेव वाघमारे, उत्तम झेंडारे,मोहन वाघमारे, हणमंत वाघमारे, बाबासाहेब वाघमारे,सुर्यकांत वाघमारे, महिला कार्यकर्त्या गीताबाई झेंडारे, ठकुबाई वाघमारे, शकुंतलाबाई वाघमारे, राधाबाई वाघमारे, स्वाती गायकवाड, श्रीदेवी वाघमारे, कमलबाई धाडवे,माजी उपसरपंच कविता गायकवाड, मुक्ताबाई वाघमारे, वंदनाबाई वाघमारे,अर्चना वाघमारे, सुगंधाबई वाघमारे, रमाबाई महादेव वाघमारे, कविता संदिपान वाघमारे, गेंदाबाई बनसोडे, कांताबाई वाघमारे, विजयाबाई वाघमारे सह महिला,ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top