गणेश जयंती निमित्त नळदुर्ग येथे मंदिरात भाविकांची गर्दी ; विविध धार्मिक कार्यक्रमाने जयंती उत्साहात साजरा
नळदुर्ग दि.१४ एस.के.गायकवाड
श्री गणेश जयंती निमित्त नळदुर्ग येथे गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.तर दिवसभर श्री गणेश जयंती निमित्ताने भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश (खिळा ) मंदिरात पहाटे अभिषेक करुन पुजा करण्यात आली. तसेच दिवसभर नळदुर्ग येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.या हरी भजन कार्यक्रमात शोभाताई ठाकूर . शुभद्राताई मुळे , शांताबाई ठाकूर , स्वाती ठाकूर , खारमुठे व माने , आदीसह भजनी मंडळाच्या सदस्याने आपली सेवा बजावली.
या कार्यक्रमाचे आयोजक ठाकूर परिवाराचे राजेंद्रसिंग ठाकूर , विजयसिंग ठाकूर , सरदारसिंग ठाकूर , मानसिंग ठाकूर , बलदेवसिंग ठाकूर , अरुणसिंग ठाकूर , किरणसिंग ठाकूर , जयपालसिंग ठाकूर , आशिष जहरवाल , आदिसह मित्र परिवारानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर धाराशिव येथील विशेष गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी बलदेवसिंग ठाकूर यांच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
नळदुर्ग शहरातील अनेक गणेश मंडळ व मंदिरात गणेश जयंती निमित्त मंगळवार दि.१३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये भजन, दुपारी श्री गणेश जन्माचा पाळणा, महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शहरालगतच्या अक्कलकोट रोड भागातील गणेश खीळा येथील मंदिरात भजन, पाळणा आदी कार्यक्रम झाले. बलदेव ठाकूर यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला. लोकमान्य गणेश मंडळ येथे डाॕ. स्वाती पाटील व डाॕ. प्रतिभा नरवडे यांच्या हस्ते गणेश जन्माचा पाळणा व पूजा करण्यात आली . राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच राजकुमार पिचे, राजकुमार खद्दे, गोपाल देशपांडे यांच्याकडून महाप्रसाद, जय भवानी तरूण गणेश मंडळ येथे भजन, पाळणा, महाआरती व दत्तात्रय दासकर यांच्याकडून महाप्रसाद तसेच भवानी नगर येथील भोईराज तरूण गणेश येथील गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सचिन भोई यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला.