अखेर नळदुर्ग ते अक्कलकोट रोडच्या प्रलंबित कामाचा आमदार राणा दादा यांच्या हस्ते सुभारंभ : रिपाइं (आठवले) च्या आंदोलनास यश

वागदरी, दि.१२ एस.के.गायकवाड
 गेल्या अनेक वर्षा पासुन नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे काम शेतकऱ्यांना जमीनीचा मावेजा मिळावा म्हणुन रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ केल्याने रखडले होते.त्यामुळे या रोडची दुरावस्था झाली आहे. हे रखडलेल्या रोडवर पुर्वी आस्थित्वात असलेल्या रोडचे  डांबरीकरण लवकरच सुरू करण्यात येत असुन तुळजापुर विधान सभेचे  आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांच्या हस्ते दि.११ मार्च  रोजी  शुभारंभ करण्यात आला.
  
वागदरी च्या सरपंच सौ तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नळदुर्ग ते अक्कलकोट रोडवर वागदरी  पाटीजवळ  डांबरीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष संतोष  बोबडे, कॄषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन संचिन पाटील,नळदुर्ग न.प.चे नगरसेवक नय्यरपाशा जहागीरदार,संजय बताले, भाजपाचे सिध्दु कोरे,विवेकानंद मेलगीरे,भिवा इंगोले, अंगद जाधव,सुशांत भुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  

यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह  पाटील म्हणाले की 'सब के साथ सब का विकास' हे ब्रिद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात अनेक विकास कामे झालेली असून दळणवळणाच्या  दृष्टीने समॄध्दी महामार्गाचे काम झाले असून आपल्याही जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नळदुर्ग ते अक्कलकोट रोडच्या डाबरीकरणाचे काम सुरु होत असून सर्वांच्या सहकार्याने चांगल्या दर्जाचे करून घ्यावे.

  तर आमदार पाटील यानी या रोडच्या कामासाठी केलेल्या विशेष प्रयत्ना बद्दल त्यांचे कृतधनता  व्यक्त करताना रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड म्हणाले की या रोडचे प्रलंबित काम त्वरीत पुर्ण करावे म्हणून रिपाइं नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने वेळोवेळी केलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. या प्रसंगी रोडचे भूमीपूजन करून टिकाव मारून रोडच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी दहिटणा,गुजनूर,येडोळा व वागदरी गावातील ग्रामस्थानी विविध विकास कामाच्या मागणीचे निवेदन दिले.
  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वागदरी येथील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी यानी केले तर सुञसंचलन प्रशांत मिटकर यानी , अभार  राधाबाई मिटकर यानी केले.
  यावेळी ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, किशोर सुरवसे, भालचंद्र यादव,प्रमोद सोमवंशी,बाळकॄष्ण बिराजदार, बालाजी बिराजदार,दत्ता सुरवसे,रामचंद्र यादव,नवनाथ  जाधव, सरपंच फुलचंद वाघमारे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top