वागदरी व बोळेगाव येथे पोलीओ लसीकरण
वागदरी,दि.०३
तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग अंतर्गत येणाऱ्या मौजे वागदरी आणि जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट अंतर्गत येणाऱ्या मौजे बोळेगाव या ठिकाणी शुन्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलीओ डोस (लसीकरण) पाजण्यात आले .
आजचा बालक हा उद्याचा आपल्या देशाचा जबाबदार नागरिक असुन देशाचे भवितव्य अप्रत्यक्ष पणे त्यांच्या हाती जाणार आहे. तेव्हा भविष्यात कोणत्याच बालकांना अपंगत्व येऊ नये म्हणून शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत सामाजिक बांधिलकी या नात्याने दरवर्षी शुन्य ते पाच वयोगटातील बालकांना गावा गावात पोलीओ डोस पाजण्याची व्यवस्था केली जाते.
त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी व बोळेगाव येथे अंगणवाडी केंद्रात बालकांना पोलीओचा डोस पाजण्यात आला.
वागदरी येते अंगणवाडी केंद्रात प्रथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग च्या वतीने पोलीओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मिनी पवार, मदतनीस रूपाली जाधव यांनी वागदरी येथील शुन्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलीओ डोस पाजण्याचे कम चोख बजावले. तर जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या बोळेगाव येथे सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते पोलीओ डोस पाजण्याची सुरुवात करण्यात आली.यावेळी आरोग्य सेवक विरभद्र आसुरे,अंगणवाडी सेविका मंगलबाई मदणे,सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरवसे यांनी बालकांना पोलीओ डोस पाजण्याचे काम पाहिले.