ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्यावरचा खोटा गुन्हा मागे घेण्याची नळदुर्ग ब्राह्मण समाजाची मागणी
नळदुर्ग,दि.०४
ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्यावरचा खोटा गुन्हा मागे घेण्याची नळदुर्ग ब्राह्मण समाजाच्यावतीने नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्व्रारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, परळी येथे झालेल्या ब्राह्मण एकता परिषदेचे आयोजक व स्वागतअध्यक्ष, ब्राह्मण समाजाचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खोट्या गुन्हाने बाजीराव धर्माधिकारी यांना मुद्दाम गोवण्यात आल्याचे आरोप करुन याबाबत आज नळदुर्ग येथील सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर नळदुर्ग ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी,ब्राह्मण समाज संघटनेचे सचिव मुकुंद नाईक, उपाध्यक्ष प्रदीप ग्रामोपाध्याय, उत्तम रामदासी, दीनदयाळ कुलकर्णी, सुहास पुराणिक, उमेश नाईक,सचिन भूमकर,प्रमोद कुलकर्णी,आकाश कुलकर्णी,राजकुमार वैद्य,संदीप वैद्य,अजय देशपांडे ,अजित भूमकर,ज्ञानेश्वर केसकर, शिवराज भूमकर, सौरभ कुलकर्णी..सुयेश पुराणिक, सौरभ रामदासी यांच्या स्वाक्ष-या आहेत.