Friday, 12 April 2024

लोकसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात, पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र नाही,18 व्यक्तींनी केली 36 अर्जांची उचल


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

 लोकसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात

 पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र नाही,18 व्यक्तींनी केली 36 अर्जांची उचल

 

धाराशिव,दि.12

 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज 12 एप्रिल रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे.आजपासून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी उस्मानाबाद  लोकसभा मतदारसंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. परंतू 18 व्यक्तींनी 36 नामनिर्देशनपत्राची उचल केली.

40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 19 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 22 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 7 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

Labels: