रोटरी क्लबकडून मुरुम शहरात शुद्ध व थंडगार पाण्याची सोय; आठवडी बाजाराकरिता येणाऱ्या ग्रामस्थांची तहान भागणार

मुरुम, ता. उमरगा, दि. ३१ 

 येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून सध्या मोठ्या प्रमाणात हवेतील तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य रस्त्यावर खास रविवार रोजी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय करण्यात आली. 


या परिसरातील विविध गावातून बाजाराकरिता येणाऱ्या वाड्या-वस्तीवरील बाळ-गोपाळ, अबालवृद्ध व नागरिकांना तात्काळ पाणी मिळावे या हेतूने या सामाजिक उपक्रमाचा तथा पाणपोईचा शुभारंभ मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, व्यापारी अमृत वरनाळे, बालाजी शिंदे, गोविंद जाधव, डॉ. नितीन डागा, डॉ. विजयानंद बिराजदार, गोविंद पाटील, डॉ. महेश स्वामी, प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, प्रा. कल्लय्या स्वामी, प्रा. राजकुमार वाकडे, प्रा. भूषण पाताळे, कल्लाप्पा पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. 

यावेळी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना रोटरी सदस्यांकडून पाणी वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाची सोय एप्रिल-मे या दोन महिन्याच्या आठवडी बाजारादिवशी करण्यात येणार असल्याचे रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे यांनी यावेळी सांगितले. रोटरीकडून पाणपोई या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.                            

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून पाणी वाटप करताना पवनकुमार इंगळे, कमलाकर मोटे, नितीन डागा, विजयानंद बिराजदार, गोविंद पाटील, अमृत वरनाळे, आप्पासाहेब सूर्यवंशी व अन्य.
 
Top