वागदरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वागदरी, दि. २४ एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी,पंचशील बौद्ध विहार समिती आणि समस्त बौध्द बांधवांच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे दि.२३ मे २०२४ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत.प्रारंभी सकाळी ठिक ८.३० वा.दरम्यान जेष्ठ कार्यकर्ते मोहन वाघमारे, युवा कार्यकर्ते उत्तम गायकवाड (शिरवळ ता.अक्कलकोट), सामाजिक कार्यकर्ते रमेश जेटीथोर माजी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन धाराशिव कृषीविकास प्रोड्युशर कंपनी लि.वागदरी (नळदुर्ग) च्या मुख्य प्रवर्तक तथा सामाजिक कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
तर सायंकाळी ठिक ७.३० वा.दरम्यान तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीचे अध्यक्ष संदीपान वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सामुदायिकरित्या बुद्ध वंदना,धम्मदेशना व इ.१२ वी बोर्ड परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सुरवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपान वाघमारे, पंचशील बुध्द विहार समितीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे, सामाजिक कार्यकर्ते रमेश जेटीथोर आदींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन सामाजिक कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या हस्ते गावातील इ.१२ वी बोर्ड परीक्षेत
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन जयंती उत्सव कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संघमित्रा अशोक गायकवाड यांचे प्रभावशाली भाषण झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षाबाई जेटीथोर म्हणाल्या की, तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यांनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी केले.
यावेळी अनिल वाघमारे, वाल्मिक वाघमारे, शिवाजी वाघमारे, दत्तू नाना वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, हणमंत वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, सहादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, रमेश वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, अण्णासाहेब वाघमारे, नितीन बनसोडे, दिपक वाघमारे, आप्पा भंडारे,माजी उपसरपंच कविता गायकवाड, गीताबाई झेंडारे, श्रीदेवी वाघमारे, ठकुबाई वाघमारे, जिजाबाई वाघमारे, वंदना वाघमारे,उज्वला वाघमारे, कमळाबाई वाघमारे, शकुंतलाबाई वाघमारे, कमलबाई धाडवे,स्वाती गायवाकड सह महिला,ग्रामस्थ युवा कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.