महाराष्ट्र टॕलेंट सर्च परीक्षेत  जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेचे २३ विद्यार्थी उत्तीर्ण

नळदुर्ग, दि.०८

मागील शैक्षणिक  वर्षी जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॕलेंट सर्च परीक्षेत ( एमटीएस) नळदुर्ग जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामाध्ये दुसरी वर्गातील ९  तिसरीतील ७  व  चौथीतील ७ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. शिक्षक बिलाल सौदागर, सुंदर भालकटे, वंदना चौधरी, जयश्री धुमाळ, सुरेखा मोरे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.


यशस्वी विद्यार्थी .- इयत्ता दुसरी - क्रांतीवीर कुमार बागडे, पद्माक्ष भगवंत सुरवसे,  आदील सज्जाद इनामदार, श्वेता शिवाजी होगाडे, साईराज मारूती वाघमारे, वैष्णवी संजय डुकरे, आर्या अतिषसिंग गहेरवार,  श्रावणी संजय गुरव, आरहान मोहीन शेख. इयत्ता ३री-  आर्चित नेताजी महाबोले,  रूद्र महेश घोडके, अथर्व अमर घोडके, नेहा सागर कौरव, तनिषा महेश घोडके, तृष्णा रवी सुरवसे,  आलिया इलियास कुरणे. इयत्ता चौथी - जान्हवी गोविंद घंटे, गायत्री कुंभार, आरती राहुल राठोड, आरसला तुराब इनामदार, सैफ मोहसीन शेख, फरहान अहमद शेख,  मफाज मेहताब शेख.
   
यशस्वी विद्यार्थ्यांचे विस्तार अधिकारी शोभा राऊत, केंद्र प्रमुख सत्तेश्वर जाधव, मुख्याध्यापक भास्कर मस्के, सर्व शिक्षक, शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  संजय  डुकरे यांनी अभिनंदन केले. शनिवारी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
 
Top