माजी  मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या ९० व्या वाढदिवसा निमित्त   महाविद्यालयात एक हजार झाडांचे वृक्षारोपण 

नळदुर्ग,दि.०३. प्रा. दिपक जगदाळे

 मागील पिढीचा इतिहास नजरेसमोर राहिला तरच भविष्यातील पिढी ही संस्कारक्षम बनेल व देशाच्या जडणघडणीत त्यांचा हातभार लागेल असे मत माजी मंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या ९० व्या. वाढदिवसाचे औचित्य साधून एक हजार झाडांचे वृक्षारोपण व अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र  आलुरे हे  तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर , सहसचिव प्रकाशराव चौगुले , सहसचिव शहबाज काजी , सहसचिव लिंबराज कोरेकर , सहसचिव अँड. प्रदीपराव मंटगे हे उपस्थित होते. 


या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केला. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले कि , शिक्षण संस्थेच्या व साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी आम्ही चौघांनी भेदभाव न करता प्रामाणिक प्रयत्न केला , सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन आम्ही चौघांनी गेली ६० वर्ष काम केले. या कालावधीत जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शाहपुरकर , संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र   आलुरे ,संस्थेचे सहसचिव  शहबाज काजी , माजी नगरसेवक विनायक अहंकारी , सौ. सुभद्राताई मुळे, सौ. कल्पना गायकवाड पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमास यशवंतराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड , माजी उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे ,माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, माजी  , मुश्ताक कुरेशी, शशिकांत पुदाले, समीर सुरवसे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, सुभाष कोरे, बलभीमराव मुळे गुरुजी, भास्करराव सुरवसे , शिवाजी गायकवाड , मल्लिनाथ शिरगुरे, दयानंद स्वामी, विशाल डुकरे, आप्पासाहेब शेटे, लिंबराज मोटे, निवृत्ती गुड्ड, देशमुख, आबेद शेख अक्षरवेल महिला बचत गटाच्या सौ. कविता पुदाले, सौ. शिल्पा पुदाले, सौ.शांताबाई ठाकूर, सौ.वैशाली डुकरे, सौ.अस्मिता पुदाले , वैशाली पुदाले, सौ. राधा मिटकर, सौ. उषा राठोड  आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी  तर उपस्थितांचे आभार कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांनी मानले. 
 
Top