केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा - आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव, दि. २६

श्री संत सेवालाल महाराज बंजारा, तांडा ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत धाराशिव  जिल्हाधिकारी अंतर्गत समितीत अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल  विलास राठोड, अलियाबाद ता.तुळजापूर यांचा सत्कार तुळजापूर विधानसभेचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आमदार पाटील यानी यावेळी व्यक्त  केली.

यावेळी माजी सरपंच वसंत पवार ,  सरपंच रमेश राठोड, उपसरपंच सतीश राठोड , दत्ता राठोड ग्रा.प. सदस्य अनिल राठोड , शिवाजी जाधव , बाळु जाधव , बंजारा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष  महेश पवार , राहुल राठोड,मोहन राठोड, प्रदीप जाधव, तानाजी राठोड , बंजारा कवी गणेश राठोड, वसंत नामा पवार , बाबु जाधव, अंकुश जाधव , आदीसह जिल्ह्यातील  तांडा वस्तीवरील लोकप्रतिनिधी,  पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
 
Top