लक्षावधी लोकांची अर्थवाहिनी असणाऱ्या बोरी धरणातील पाण्याची खणा नारळाने ओटी भरून महाआरतीने खडकाळी मॉर्निंग ग्रुपने केले
जलपुजन
नळदुर्ग बोरीधरण ओव्हर फ्लो पाण्याचे जलपूजन
अणदूर ,दि.२७
अनेक गावांच्या परिसरातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेले नळदुर्ग येथील बोरी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे तीन वर्षापर्यंत परिसरातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखदायी आणि अर्थसंपन्न होणार असून शेतकरी भविष्यात सुखावला जाणार आहे. त्याचं अर्थकारण व त्याचं रोजचा व्यवहार देखील सुखावला जाणार आहे .
बोरी धरण हे फार मोठे जलाशय आहे. हे जलाशय या परिसरातील जलवाहिनी नसून या परिसरातल्या लाखो लोकांची अर्थवाहिनी आहे अशी प्रतिक्रीया डॉ. जितेंद्र कानडे यांनी व्यक्त केली.
परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नळदुर्ग येथील बोरी धरण तलाव शंभर टक्के क्षमतेने तुडुंब भरला असल्यामुळे आणदुर ता तुळजापूर येथील खडकाळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बोरी धरण पाण्याचे जल पूजन,धरणातील पाण्याची खणा नारळाने ओटी भरून महाआरती करण्यात आली.
यावेळी डॉ .जितेंद्र कानडे बोलत होते . बोरी धरण भरल्याने नळदुर्ग , तुळजापूर अणदुरसह अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून हजारो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी देखील उपलब्ध होणार आहे,त्यामुळेच अणदूर येथील खडकाळी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी या धरणाचे ऋण व्यक्त करून हजारो शेतकऱ्यांच्या वतीने जलपूजनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. धरण ओव्हर फ्लो होवून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या ओव्हर फ्लो पाण्यामुळे नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर - मादी धबधबा सुरू झाला आहे. धबधबा पाहण्यासाठी राज्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे .
जलपूजन प्रसंगी खडकाळी मॉर्निंग ग्रुपचे डॉ. जितेंद्र कानडे , डॉ. नागनाथ कुंभार , डॉ. हरिदास मुंडे , सिद्धाराम धमुरे , बाळकृष्ण पाटील , अविनाश मोकाशे , पत्रकार अजय अणदुरकर , गुरुनाथ कबाडे , चंद्रकांत गुड्ड , प्रसन्न कंदले , बाबु शेख , गुणवंत मुळे, वैजिनाथ कुंभार , प्रा. एम. बी.बिराजदार, सुहास कंदले, संजू मोकाशे, मल्लिकार्जुन नरे,खंडू मुळे, सचिन ढेपेसह खडकाळी मॉर्निंग ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते .