अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष देण्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन
नळदुर्ग ,दि.१२ :
मन , मेंदू बळकट होण्यासाठी शरीर मजबुत पाहिजे, व्यायामाने शरीराचा विकास होतो.त्याकरीता अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बोलताना व्यक्त केले.
नळदुर्ग शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शालेय तालुका स्तरीय ( मुले - मुली ) खो- खो स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
दि.१२ संप्टेबर रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेसाठी अंबुमात कनिष्ठ महाविद्यालय सलगरा, राजश्री महाविद्यालय आलियाबाद (जळकोट), सैनिकी महाविद्यालय तुळजापूर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ,इतर मुलीचे दोन संघ असे मिळून तुळजापूर तालुक्यातील ६ महाविद्यालयीन संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर आभार डॉ. कपिल सोनटक्के यांनी मानले . या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा शिक्षक डॉ. कपिल सोनटक्के प्रा. अशोक कांबळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.