शहर पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूकी च्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहिर

नळदुर्ग ,दि.०३

सोमवार  दि. 02 सप्टेंबर  रोजी नगर परिषद नळदुर्ग येथे  शहर पथ विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला आहे.

 त्यामध्ये शहर पथ विक्रेता समितीमध्ये आठ सदस्य घेणे अपेक्षित असून त्या आठ सदस्यापैकी दोन जागांसाठी आरक्षण सोडत काढली त्या पैकी अनुसूचित जाती महिला साठी आणि विकलांग व्यक्ती महिला साठी आरक्षित झाले आहे . सदर आरक्षण सोडतची चिठ्ठी  डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कुल नळदुर्ग मधील इयत्ता दुसरी चा विध्यार्थी कु साद सादिक बागवान याच्या हस्ते काढण्यात आली. सदर शहर पथ विक्रेता निवडणूक 2024 च्या सोडत ही श्री लक्ष्मण कुंभार निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी न. प नळदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली . सदर आरक्षण सोडतीस सहाय्यक  म्हणून श्री सुरज गायकवाड सहायक प्रकल्प अधिकारी  यांनी सहाय्य केले.


 तसेच माजी नगर सेवक मुसताक कुरेशी, विनायक अहंकारी पत्रकार विलास येडगे, भगवंत सुरवसे, सादिक बागवान, मन्सूर शेख व समीर मोकाशी अभियंता आवास योजना न प नळदुर्ग इतर पथविक्रेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top