कुठले लोक म्हणत आहेत? आमदारांनी आमच्या गावातच घर करावे
विकासाचा महामेरू आमदार राणाजगजितसिंह पाटील
नळदुर्ग दि.१५: शिवाजी नाईक
नळदुर्ग भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता सतत शासनाकडे पाठपुरावा करत अनेक दशकांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच विकास कामांसाठी नळदुर्गला भरघोस निधी मंजूर करुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकासाचे पर्व सुरू केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय रंगला आहे.
नळदुर्ग शहराच्या सर्वागीण विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधीतून नळदुर्ग शहरात अनेक महत्वाची विकास कामे होत आहेत. नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच शहराच्या विकास कामासाठी इतका मोठा निधी उपलब्ध झाला आहे.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्गच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिल्याने शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे ४६ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. हे कामामुळे शहरवासियांना दररोज नळाव्दारे पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा व महत्वपूर्ण आहे.
कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र नेहमीचे झाल्याचे सर्वश्रुत आहे. त्यावर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला आहे. त्याचबरोबर शहरात अप्पर तहसील कार्यालयाचे विजयादशमीच्या मुहूर्तावर उदघाटन करण्यात आले.आमदार पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले आहे.शहर व परिसरातील नागरिकांनी आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले व त्यांचा सत्कारही केला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा कार्यकाल
२००४ - २००९ : कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि
रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री,
२००८ ते नोव्हेंबर २००९ : महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व
संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री,
२००५ ते २००८ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
२००८ ते २०१४ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभेवर निवड.
२०१९ - तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवड.
२००९ धाराशिव (उस्मानाबाद) विधानसभा निवडणुकीत पराभुत
त्याचबरोबर या निधीतून भव्य अशी बसवसृष्टी, कै. वसंतराव नाईक स्मारक, मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक, शादीखाना ही कामे होणार आहेत. तर पाच एकर क्षेत्रावर भव्य असा बुध्द विहार निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत.या कामामुळे नळदुर्ग शहराच्या सौदर्यात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी ई-लायब्ररी व अद्यायवत अभ्यासिका केंद्र उभारण्यात येणार आहे.
सुमारे ९३ कोटी रुपये खर्चाची शहरातील विविध ठिकाणी रस्त्याची कामे होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे रस्त्याचे काम म्हणजे राष्ट्रीय महामार्ग हे जुन्या खंडोबा मंदिरापर्यंत रस्त्याचे काम आहे. या रस्त्याची रुंदी वाढविण्यात येत आहे.
त्यामुळे श्री खंडोबाच्या यात्रेसाठी नळदुर्ग -मैलारपूर येथे येणाऱ्या भाविकांना आता वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही. भाविक तसेच चिंकुद्रा, किलज, सलगरा दिवटी या भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी देखील हा रस्ता सोईचा ठरणार आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात गटार व रस्त्याची कामे, सभागृह, जॉगिंग ट्रॅक, बगीचा विकसित करणे, सभामंडप, व्यायाम शाळा, सांस्कृतिक सभागृह नूतनीकरण करणे ही कामे होत आहे. शहरातील विविध दहा ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीमधून आर.ओ. प्लॅन्ट उभारण्यात आले आहे. याचा शहरातील नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. या आर.ओ.प्लॅन्टमधून फक्त पाच रुपयांमधून २० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. पाणीटंचाई तसेच उन्हाळ्यात नागरिकांना या आर.ओ. प्लॅन्टचा मोठा आधार ठरला आहे. भीमनगर येथेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपये खर्चाची विकासकामे होत आहे.
येणाऱ्या काळात नियोजित नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न, औद्योगिक वसाहत, पर्यटकांना राहण्यासाठी अद्यायावत भव्य असे विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ ही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा व होणार पाणी बचत
पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर धाराशिव जिल्ह्यातील शिवार हिरवेगार होण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र सिंचन व सुधारणा कार्यक्रम अंतर्गत नळदुर्ग येथील कुरनूर मध्यम प्रकल्पासाठी मुख्य कालवा (९.७५कि.मी) अस्तरीकरण व वितरण व्यवस्था सुधारणा या कामासाठी रुपये २९ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामाची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे बोरी धरणातून शेतीसाठी कॕनाॕलद्वारे मिळणारे पाणी वाया न जाता पाणीबचत होणार आहे. शेतक-यातुन आनंद व्यक्त केला जात आहे.
नळदुर्गवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विशेष जीव असण्याचे कारण म्हणजे ज्येष्ठ नेते डाॕ.पद्मसिंह पाटील यांना नळदुर्गकरांनी दिलेली साथ व डाॕक्टरसाहेबांचे नळदुर्गकरांशी असलेले जिव्हाळ्याचे संबध. मागील पाच वर्षात आमदार पाटील यांनी नळदुर्ग शहरास दिलेला भरमसाट निधी व दिलेल्या असंख्य भेटीबद्दल काही नळदुर्गकर विनोदाने म्हणतात की दादांनी आमच्या मनात घर केलय मात्र दुर्गातही एक घर करावे.