सत्तर वर्षात त्यांना जमले नाही ते राणादादांनी करून दाखवले!, आम्ही राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी


 नळदुर्ग,दि.१८ :

सत्तर वर्षाच्या कालावधीत एकाही आमदाराला आमचे प्रश्न सोडविण्याचे जमले नाही.  प्रशासनाने आमच्यावर अन्याय केले. मात्र राणादादांनी सर्वसामान्याचे प्रश्न सोडवुन  आमच्या पाठीशी असल्याचे कृतीतुन  दाखवुन दिले आहे. त्यामुळे आम्ही राणादादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची प्रतिक्रिया नळदुर्ग शहरातील
बंजारा समाजाच्या नागरिकांनी कार्यकर्त्यांना दिली. 

नळदुर्ग शहरातील (बुथ क्रमांक ३६६) अक्कलकोट रोड
शासकीय धान्य गोडाऊन समोरील बंजारा समाजाच्या वस्तीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे महायुती भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे  शहराध्यक्ष धिमाजी घुगे, भारतीय जनता युवा मोर्चाचे  शहराध्यक्ष गणेश मोरडे, मयुर महाबोले यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवार   रोजी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतले असता यावेळी  त्यांचे स्वागत करून राणादादानी केलेल्या कामाची माहिती मतदारांनीच भाजप कार्यकर्त्यांना दिली. गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या घर जागेची न.प. कार्यालयात नोंद घेऊन नक्कल दिली. ही राणादादामुळे शक्य झाले. असे ज्येष्ठ नागरिक नामदेव तुकाराम जाधव यांनी सांगितले.


यावेळी जगदंबादेवी व सेवालाल महाराज मंदिराच्या समोर एकत्र आले असता भाजप शहराध्यक्ष  धिमाजी  घुगे यांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी येथील नागरिकांनी आपल्या समस्या व अडचणी त्यांना सांगितले. 

ज्येष्ठ नागरिक नामदेव जाधव,रेवू चव्हाण ,नामदेव नाईक, युवक कार्यकर्ते ,अविनाश बंजारे ,अरुण नाईक,नवल नाईक ,किरण नाईक ,रोहित निंबाळकर किरण जाधव,अशोक बंजारे , सुधाकर नाईक ,राहुल राठोड ,सुभाष पवार,विशाल नाईक , सौ सुनिता जाधव,
श्रीमती अंबुबई कांबळे, सौ शांताबाई राठोड, सौ पेमाबाई जाधव, श्रीमती जिजाबाई नाईक, श्रीमती मोताबाई बंजाररे , सौ शांताबाई नाईक, सौ रणुबाई नाईक, सौ अनिता नाईक , सौ छायाबाई नाईक आदीसह
 महिला पुरुष उपस्थित होते.
 
Top