पत्रकारांनी व जनतेनी तिसऱ्या पिढीपर्यंत मला साथ देवून महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवून दिली सेवेची संधी : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
नळदुर्ग,दि.११ : एस. के. गायकवाड
तुळजापूर मतदारसंघातील पत्रकारांनी व जनतेनी तिसऱ्या पिढीपर्यंत मला साथ देवून महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवून सेवेची संधी दिल्याचे सांगुन पत्रकारानी अन्याय, आत्याचाराच्या विरोधात व समाजातील गोरगरीब जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखनीचा वापर करुन वास्तव माडून ,न्याय देण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून करण्याचे माजी मंत्री मधूकरराव चव्हाण यानी तुळजापूर येथे आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभात बोलताना सांगितले .
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, संयोजक अमर मगर यांच्या हस्ते महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून तालुक्यातील शहर पत्रकार संघ ईटकळ, ग्रामीण पत्रकार संघ व नळदुर्ग शहर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तामलवाडी, अणदूर पत्रकार संघ आदी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, या तालुक्यातील पत्रकारांनी व जनतेने तिसऱ्या पिढीपर्यंत मला साथ देवून महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवून तालुक्याच्या व जिल्हयातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली. मी वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात आलो आणि तुळजापूर पंचायत समितीचे सभापती ते महाराष्ट्राच्या मंत्रीमंडाळत मला काम करण्याची संधी मिळाली .त्याममध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे . सध्या महाराष्ट्रात आराजकता माजली असून बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख याची हात्या करण्यात आली. तर परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू या दोन्ही घटना मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. यातील आरोपीना शिक्षा झाली पाहिजे, या कामी सुद्धा पत्रकारांनी या प्रकरणी वास्तव लिखाण करून या दोन्ही पिडित कुटुंबाना न्याय मिळून देण्याकामी कार्य करावे असेही आवहान माजी मंत्री मधूकरराव चव्हाण यांनी केले.
यावेळी बीड आणि परभणी येथील झालेल्या हत्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन संबधित मंत्र्यानी राजीनामा द्यावा असा ठरावही सहमत करण्यात आला. याप्रसंगी जि .प .चे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुंकूद डोंगरे,प .स .चे माजी सभापती शिवाजी गायकवाड, नवाज काझी, युवा कार्यकर्ते आभिजीत चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर हजारे आदीसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक पत्रकार बांधवानी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा व्यक्त केली.
जेष्ठ पत्रकार अंबादास पोफळे, डॉ सतीश महामुनी, श्रीकांत कदम, प्रदिप अमृतराव, संजय खुर्द, गोवींद खुर्द, अजम चंदनशिवे,जगदीश कुलकर्णी, उमाजी गायकवाड, संतोष मगर, विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे , अजित चव्हाण, अय्युब शेख,
उत्तम बणजगोळे, प्रा.पंडूरंग पाळे, सुहास येडगे, श्रीनीवास भोसले, एस.के.गायकवाड, अरुण लोखंडे, मेघराज किलजे, संजय पिसे, विजय पिसे, विरभद्र पिसे, शाम नागीले,किशोर धुमाळ, चंद्रकांत गुड्ड, गुरुनाथ कबाडे,राजेंद्र स्वामी, केशव गायकवाड,दिनेश सलगरे, राहुल काबळे,इरफान काझीसह परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक संयोजक अमर मगर यांनी केले तर सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे तर अभार शिवाजी गायकवाड यानी मानले.