नळदुर्ग येथे संविधान सन्मान परिषद व परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
नळदुर्ग,दि.०१
परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या वतीने संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संविधान सन्मान परिषद व त्याचबरोबर परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम रविवार दि.०२ फेब्रुवारी रोजी होणार आहे .
प्रतीवर्षा प्रमाणे राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी पुण्याचे डॉ. मिलिंद वाकोडे , ॲड. मैना भोसले, विजय कांबळे सह अन्य मान्यवरांना जाहीर करण्यात आला आहे
गेली २३ वर्षे परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या कडून कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, युवक, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या वर्षी ही हा कार्यक्रम दि.२/२/२०२५ रोजी आपलं घर प्रकल्प आलियाबाद नळदुर्ग येथे सकाळी ११.३० वाजता संविधान सन्मान परिषद व राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल भाऊ सूराणा आहेत तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.सुरेश वाघमारे ज्येष्ठ विचारवंत लातूर हे आहेत.संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत यामुळे संविधान सन्मान परिषद व पुरस्कार वितरण असा एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी दिली आहे