आलियाबाद येथील श्रीयुष चव्हाण याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

तुळजापूर ,दि.१०: 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील संघात श्रीयुष चव्हाण याची फलंदाज म्हणून निवड झाली आहे. यामुळे श्रीयुष चव्हाणचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. 
  श्रीयुषचे मूळ गाव हे तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद आहे. श्रीयुषला लहानपनापासूनच क्रिकेटची आवड होती. ही आवड त्याचे वडील शिक्षक संजय चव्हाण यांनी ओळखली. त्याला प्रोत्साहन देऊन सर्वात पहिल्यांदा क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. पुण्यातील नावाजलेले अंबिशियस क्रिकेट क्लबचे कोच मनीष देसाई, क्लब ओनर सुनील मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करू लागला. यासाठी श्रीयुषला प्रशिक्षक शंकर दळवी, निकोज विटलानी, रोहित कारले, उमा, ऋषी, भरत, जॉनटी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
 
  श्रीयुषने निवड सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि निवडकर्त्यांना आकर्षित केले, निवडक सामन्यांमध्ये त्याने नाबाद १५४  नाबाद १०८ तसेच ९५ आणि ९१ धावा ठोकून आपली चुणूक दाखवली. 
श्रीयुषच्या लहानपणीच त्याचे वडील संजय चव्हाण व आई सुनीता चव्हाण यांनी श्रीयुषला क्रिकेटर बनवण्याचे, राज्य आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने 14 वर्षांखालील महाराष्ट्रात संघात निवड होऊन  श्रीयुषने मोठे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल यशस्वीपणे पूर्ण केले.
 
 या  निवडी बद्दल  भाजपा तालुका सरचिटणीस तथा अशासकीय जिल्हा सदस्य संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना धाराशिव विलास राठोड, सरपंच सूर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, ग्रा. पं. सदस्य मनोज चव्हाण, शिवाजी नाईक, डॉ.वाय.के. चव्हाण, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण यांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल जिल्ह्यातील तांड्या तांड्यातून  त्याचे कौतुक होत आहे.
 
Top