वागदरी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाने संत तुकाराम महाराज गाथा पारायणा सप्ताहास प्रारंभ

वागदरी,दि.१४: एस.के. गायकवाड :

ग्रामदैवत श्री संत सदगुरु भवानसिंग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या तुळाजापूर तालुक्यातील वागदरी येथे गुरुवार दि .१३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह व सामुदायिक विविह सोहळ्यास सुरुवात करण्यात आली आहेे.

  श्री सदगुरू भवानसिंग महाराज यांच्या कृपा आशिवदिने सकळ ग्रामस्थ वागदरीच्या वतीने वागदरी तुळजापूर येथे गुरुवार दि.१३/०२/ २०२५ ते गुरुवार दि. २०/o२ /२ o२५ दरम्यान ह.भ.प. राजकुमार पाटील यांच्या व्यासपीठ आधिष्ठाणा खाली श्री संत तुकराम महाराज गाथा पारायण व श्रीमद् भागवत कथा.. ज्ञानयज्ञ सप्ताह व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पारायण सप्ताह सोहळ्यास गुरुवार दि.१३ फेब्रूवारी २०२५ रोजी सकाळ ६.oo वा.विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली.या सप्ताह निमित्ताने ह.भ.प ज्ञानेश्वर महराज दिंडेगावकर,वैभव महाराज भालकडे कानेगावकर, बालकिर्तनकार शुभमसिंग परिहार महाराज वागदरी, विलास कदम महाराज मांडवीकर,कृष्णा काकडे महाराज वागररी, राम गायकवाड महाराज चिकूंद्रा, राजकूमार पाटील महाराज वागदरी आदींची किर्तन सेवा होणार असून वागदरी व परिसरातील भजनी मंडळाच्या भजनाच्या (हरी जागर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शेवटी दि.२०/o२ /२o२५ रोजी ह.भ.प श्रीहरी ढेरे महाराज काक्रंबा यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. 

तरी वागदरी,नळदुर्ग व परिसरातील भावीक भक्तानी मोठ्या संख्येने या .पारायण सप्ताह सोहळ्यान मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवहान श्रीसंत सदगुरु भवानसिंग महाराज भजनी मंडळासह समस्त ग्रामस्थानी केले आहे
 
Top