नळदुर्ग: बालाघाट महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

नळदुर्ग,दि.०३:


शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,  परिवर्तन  संस्था , खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकार मधुमक्षिका पालन कार्यालय पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.


 कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ. सुभाष राठोड  तर  प्रमुख पाहुणे म्हणून खादी ग्रामोद्योगचे डॉ. मिलिंद वाकोडे  हे उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. हंसराज जाधव आणि परिवर्तनचे सचिव  मारुती बनसोडे हे संयोजक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवारांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. मान्यवारांच्या स्वागतानंतर 
या कार्यशाळेमध्ये डॉ. मिलिंद वाकोडे यांनी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संदर्भाविषयी विद्यार्थ्यांना एक फिल्म  दाखवून सखोल असे मार्गदर्शन केले, त्यानंतर अध्यक्षीय समारोपमध्ये प्राचार्य सुभाष राठोड यांनी विध्यार्थ्यांना मधुमक्षिका पालन विषयी  महत्व पटवून सांगितले. या कार्यशाळेला विद्यार्थी  उपस्थित होते.

 प्रास्ताविक  मारुती बनसोडे  तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. हंसराज जाधव यांनी ,आभार प्रा. डॉ. सचिन देवद्वारेनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अंनिरुद्ध बाबारे , अतुल बनसोडे यांनी परिश्रम घेतले.
 
Top