नळदुर्ग: श्री रामतीर्थ देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन ; महंत श्री विष्णु शर्मा महाराज 

नळदुर्ग,दि.२३:

महाशिवरात्री महोत्सवा निमित्त नळदुर्ग येथिल श्री क्षेत्र रामतीर्थ येथे बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी भरगच्च विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सकाळी ८.३० वाजता संगीतमय महारुद्र अभिषेक होणार असुन संगीतमय रुद्राभिषेक  श्री उपेंद्र पांडे व मंडळी, हैद्राबाद (भाग्यनगर) यांच्या समवेत होईल.तसेच सकाळी ११ वाजता  शोभायात्रा, सकाळी १२.२० :  महाकाल महाआरती,दुपारी  १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

संगीतमय रुद्राभिषेक मध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी  आपल्या नावाची नोंदणी करावी. त्यानंतर रुद्राभिषेकची नोंदणी घेण्यात येणार नाही व फक्त ३०१  भक्तानाच रुद्राभिषेक मध्ये सहभागी  होता येईल याची  नोंद घ्यावी व या पवित्र धर्मकार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी केले आहे.

 ज्या भक्तांनी पावती केली आहे, त्यांना विनंती की सोबत येताना पूजा ताट, पूजा कलश व पुजापळी घेवून येणे, बाकी पूजा साहित्य मंदिर देवस्थान तर्फे देण्यात येईल. संगीतमय रुद्राभिषेक देणगी पावती करीता श्री रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग येथे संपर्क साधावा, ड्रेस कोड : पुरुष - पांढरे वस्त्र, स्त्रिया - लाल साडी असे परिधान करावे.

 
Top