शहरात छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ पुतळा उभारावा,नळदुर्गकरांची पालकमंत्र्याकडे मागणी
उपजिल्हा रुग्णालयाचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय असे नामकरण व्हावे,शिवप्रेमीची इच्छा
नळदुर्ग,दि.२०:
शहर हे एक ऐतिहासिक शहर असून,नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते,दरवर्षी लाखो पर्यटक व भाविक शहरात किल्ला पाहण्यासाठी,व देवदर्शनाला येतात,शहराला दोन राष्ट्रीय महामार्ग लाभले असून,परिसरातील 60 गावांचा कामानिमित्त रोजचा संपर्क आहे,अशा या ऐतिहासिक शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांची अनेक वर्षांपासून आहे.
त्याचबरोबर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे हि भावना सुद्धा शिवभक्तांची आहे,दि-19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त शहरात अनेक ठिकाणी पूजन झाले. त्या प्रत्येक ठिकाणी हि भावना शिवप्रेमीनी व्यक्त केली आहे,त्याच अनुषंगाने समस्त नळदुर्ग शहर वासियांच्या वतीने सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन,उपजिल्हा रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे आले असता त्यांना या मागण्याचे निवेदन देण्यात आले,
यावेळी शिवसेना उबाठाचे कमलाकर चव्हाण,काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष शहबाज काजी,रा.कॉ.पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे,भाजपाचे सुशांत भूमकर,माजी उपगराध्यक्ष इमाम शेख,शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके,मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले,माजी नगरसेवक बसवराज धरणे,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,माजी नगरसेवक विनायक अहंकारी,शिवसेना उबाठाचे सरदारसिंग ठाकूर,दत्तात्रय कोरे,माजी नगरसेवक सुधीर हजारे,शशिकांत पुदाले, उमेश नाईक,संजय जाधव,पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे,जेष्ठ पत्रकार विलास येडगे,लतीफ शेख,काँग्रेस कमिटीच्या सुभद्राताई मुळे,सामाजिक कार्यकर्त्यां कल्पना गायकवाड,विनायक पुदाले,पप्पू पाटील,शिवाजी सुरवसे,मनोज मिश्रा,गौस कुरेशी,आदिजण उपस्थित होते.शहराचे महत्व वाढविण्यासाठी या ठिकाणी बसडेपोची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी याबाबत हि निवेदन देण्यात आले.