रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र हे माणसाला सर्वांग सुंदर जिवन जगण्याला प्रेरणा देते : भैरवनाथ कानडे
वागदरी ( एस. के.गायकवाड):
मातृभूमीची परकीय अमलापासून मुक्तता,म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचे जीवनकार्य होते. या कार्यासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्यांचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असे प्रशासन निर्माण केले . त्यांची कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमांइतकीच महत्त्वाची आहे. सामान्य माणसाचे,गोरगरीब रयतेचे कल्याण व संरक्षण हे त्यांच्या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने लोककल्याणकारी राजे म्हणून जगभरात त्यांची प्रतिमा निर्माण झाली.मराठयांचे एकीकरण करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची अभिलाषा उत्पन्न करणे, याशिवाय समाजात राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणे याचा संदेश आपणास शिवचरित्रातून मिळतो.तेव्हा शिवप्रभुंच्या विचार कार्यावरच आमच्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असून शिवचरित्र हे आमच्या सर्वांग सुंदर जगण्याची प्रेरणा आहे.असे मत भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केले .
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरीच्या वतीने आयोजित शिवसप्ताहाच्या प्रसंगी ' "शिवचरित्र जगण्याची प्रेरणा" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते भालचंद्र यादव हे हाते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गणेश बिराजदार,तंटा मुक्त अध्यक्ष तथा माजी सरपंच राजकुमार पवार आदी होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग,व संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करू आभिवादन करन्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन अँड. अमोल पाटील यानी केले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते फतेसिंग ठाकूर, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे,उत्तम झेंडारे, रिपाइं (आठवले) जिल्हा समन्वयक एस.के. गायकवाड,नामदेव यादव, पांडू बिराजदार, जन्मोत्सव मंडळाचे प्रमोद बिराजदार,श्रीकार धुमाळ भगतसिंग ठाकूर, सह ग्रामस्था,महिला, यूवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.