ताज्या घडामोडी

वागदरी शिवारात शॉट सर्कीट मुळे ठिणगी पडुन लागलेल्या आगीचा वनवा भडकला : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

वागदरी ,दि.२६: एस. के. गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी शिवायरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्यूत वहाक तारेवर झालेल्या शॉट सर्कीट मुळे ठिणगी पडून लागलेल्या आगीचे रुपांतर वनव्यात झाले आणि बघता बघता आगीचा वनवा भडकून शेजारील सहा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने कसलीही जिवीत हानी झाली नाही पण मोठ्य प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
 
  याबाबत वृत्त असे की दि.२४ फेब्रुवारी २o२५ रोजी दुपारी १.३o वा. सुमारास वागदरी ता.तुळजापूर शिवारातील गट नंबर ६४ व,६५ मधिल शेतकरी नागनाथ चव्हाण यांच्या शेतात विद्यूत वहाक तारेवर झालेल्या शॉट सर्किट मुळे ठिणगी  पडून शेतातील गवताला आग लागली. उन्हाच्या तिव्रतेमुळे व अधुमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेमुळे त्या आगीचे वनव्यात रूपांतर होऊन आगीचा भडका उडाला व आग सर्वत्र पसरून जवळपास दहा एकर शेत जमिनीवरील जनावराचा चारा (गवत)जळून गेल तर गट नबर ७५ मधिल गुरूनाथ सोमा वाघमारे यांच्या शेतात जनावरासाठी चारा म्हणून बनिम रचून ठेवलेला २५०० पेंढ्या ज्वारीचा कडबा, गोटयावरील 30 पत्रे, शेतीउपयोगी अवजारे, ताडपत्री, वगेरे जळुन अंदाजे १,५०,००० रूपये (एक लाख पन्नास हजार रुपयाचे)नुकसान झालेले आहे तर याच गटातील राजकुमार सोमनाथ वाघमारे यांचा सोयाबीनचा दोन ट्रॉली चारा व एक सायकल असे अदाजे पंधरा हजार रुपये  (१५००० रु )चे नुकसान झाले तर गट नंबर ७४ मधिल कुंडलिक जगन्नाथ वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीनचा चारा व शेती उपयोगी साहीत्य तर याच गटातील बाबासाहेब कुंडलिक वाघमारे यांचे दहा पत्रे,१५०० ज्यारीच्या कडब्याच्या पेंढया, सोयाबिनचा दोन ट्रॉली चारा, शेती उपयोगी अवजारे जळून मोठे नुकसार झाले आहे.तसेच गट नंबर ६७ मधिल श्रीधर भाऊराव बिरादार यांच्या शेतातील काढणीस आलेले तुरीचे पिक व शेती अवजारे जळून अंदाजे १५ooo रु.पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर गट नंबर ७३ मधिल मोहन सोमवंशी, प्रमोद सामवंशी व नितीन सोमवंशी यांचा सोयाबिनचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून मोठे नुकसान झाले आहे.
   
सदर जळीत घटनेचा ग्राम महसुल आधिकारी सज्जा खुदावाडीचे तलाठी धनंजय मेहदंर्गी यानी प्रतक्ष घटनास्थळी पंचनामा करून संबधित वरिष्ठाधिकारी तहसीलदार तुळजापूर याना सादर केला आहे.
 सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून जळीतग्रस्त शेतकऱ्याना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
 
Top