चोरांचा नवा फंडा, वृध्द महिलेस नकली सोन्याचे बिस्कीट दाखवून असली एक तोळा सोन्याच्या गंठणला घातला गंडा : नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील घटना 

वागदरी,दि.०२ : एस.के.गायकवाड 

बसस्थानकावर किंवा आठवडी बाजारात,यात्रा या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत खिशातील मोबाईल, गळ्यातील गंठण, मगळसुत्र, रोख रक्कम असा  चोरीच्या घटना ह्या नव्या नाहीत, पण अता चोराचा नवा फंडा नळदुर्ग बसस्थानक परिसरात पुढे आला असून दिवसा ढवळ्या सकाळी १०.३० ते १२  वाजण्याच्या दरम्यान एका वृध्द महिलेस नकली सोन्याचे बिस्कीट दाखवून असली एक तोळा सोन्याचे गंठण जबरदस्तीने गळ्यातून काढून घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना  नळदुर्ग बसस्थानक परिसरात घडल्याचे उघडकीस आली आहे.
  
याबाबत मिळालेली माहिती की, दि.२७ फेब्रुवारी २o२५ रोजी नळदुर्ग पासुन जवळच अंतरावर असलेल्या वागदरी ता.तुळजापूर येथील पार्वतीबाई रघुनाथ वाघमारे वय ७० वर्ष ही वृध्द महिला सकाळी  १०.३० वा.दरम्यान दवाखान्यात उपचारासाठी एसटी बसने नळदुर्गला आली. बसस्थानकातून  दवाखान्याकडे जाण्यासाठी एकटीच पायी चालत निघाली असता बसस्थानका समोरच राष्ट्रीय महामार्ग ओलांडून ती नळदुर्ग शहरात प्रवेश करणाऱ्या रोडवरील राष्ट्रीय महामार्ग लगतच असलेल्या भाजी विक्रते व कुरेशी यांच्या किराणा दुकाना समोर आली असता दोन अज्ञात तरुण तिच्या जवळ आले.त्यांनी त्यांच्या जवळ असलेले छोट्या कापडाच्या चिंदीत बांधलेले छोट गाठोडं त्या वृध्द महिलेच्या पायाजवळ टाकले दोघा पैकी एकाने ते गाठोडं उचलले अरे यात पैसे आहेत आजीला पण हिस्सा द्याव लागेल चल आजी पैसे वाटून देतो म्हणून हाताला धरून ती नको म्हनत असताना देखील त्यानी त्या वृद्ध महिलेस बसस्थानका समोर जवळच अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला  (मुलांची) नळदुर्ग च्या पटांगणात निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले.ती गोधळून गेली होती घाबरली होती.अशा अवस्थेत एकाने ते छोटे गाठोडं सोडले.अरे व्वा आजीचे नशिब चांगले आहे.यात सोन्याची बिस्किटे आहेत. आजी तुझ्या गळ्यातील गंठण दे आणि हे सोन्याचे बिस्कीट घे असे म्हणून तीला काही कळण्या आगोदरच तिच्या गळ्यातील गंठण काढले व नकली सोन्याचे बिस्किट लाल कागदात गुंडाळून दिले.ती घरी वागदरीला आल्या नंतर घडला प्रकार तिने आपला मुलगा अनिल रघुनाथ वाघमारे याना सांगीतला. त्याने त्या बिस्किटावर हातोडा मारून बघितले तर ते कॅरबरी चॉकलेटच्या अकाराच्या छोटय लोखंडी पट्टीला सोनेरी रंग दिल्याचे आढळून आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे आजीच्या लक्षत आले असता त्यानी आपला मुला सोबत नळदुर्ग पोलीस ठाणे गाठले व घडल्या घनेटनेची लेखीतक्रार दिले आहे .

याबाबत  पारिसरात एकच खळबळ उडाली असून नळदुर्ग बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढले असून नळदुर्ग पोलिसा समोर हे एक मोठे आव्हान निर्मान झाले आहे.
 
Top